BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

जिल्हा परिशद चन्द्रपुर अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रश्नाचे निराकरण करण्याची मागणी

Summary

आदरणीय नाम. बच्चू भाऊ, राज्य मंत्री, आणि राज्य अध्यक्ष श्री. महेश ठाकरे आपण चंद्रपूर जिल्हा परिषद मधील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित समस्या तात्काळ निवारण्यासाठी मा. विभागीय आयुक्त, नागपूर यांना चंद्रपूर जिल्हाचे मा. जिल्हाधिकारी, मा. मुख्यकार्यकारी अधिकारी यांना निर्देश देऊन बैठक घेण्याचे […]

आदरणीय नाम. बच्चू भाऊ, राज्य मंत्री, आणि राज्य अध्यक्ष श्री. महेश ठाकरे आपण चंद्रपूर जिल्हा परिषद मधील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित समस्या तात्काळ निवारण्यासाठी मा. विभागीय आयुक्त, नागपूर यांना चंद्रपूर जिल्हाचे मा. जिल्हाधिकारी, मा. मुख्यकार्यकारी अधिकारी यांना निर्देश देऊन बैठक घेण्याचे निर्देश दिलेत. चंद्रपूर जिल्हा परिषद मधील 48 समस्या मधील प्रमुख समस्या मागील तीन वर्षांपासून प्राथ. शिक्षक, विषय शिक्षक, उच्च श्रेणी मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी शिक्षण यांना वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी मिळालीच नाही, दरवर्षी वरिष्ठ v निवड श्रेणी चे प्रस्ताव तयार करून लागू करायला पाहिजे होते परंतु प्रशासन निगरगट्ट आहे. भविष्य निर्वाह निधीतुन आपलीच रक्कम मागण्यासाठी मुली मुलाच्या लग्नासाठी अर्ज सादर केला तर नातवाच्या जन्मानंतर बारसं करण्यासाठी रक्कम मिळतोय, वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक मागील सहा महिन्यापासून जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी रोग प्रमाणित करण्याचे नाकारले, प्रहार शिक्षक संघटनेने मार्च महिन्यात पत्र दिले, वारंवार पत्र दिले तेव्हा मा. मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी 31 ऑगस्ट 2020 ला जिल्हा आरोग्य अधिकारी यांना प्रतिपूर्ती देयक मंजूर करण्याचे अधिकार आहेत हे सांगण्यासाठी तब्बल 6 महिने लागलेत, चंद्रपूर जिल्हा परिषद मध्ये 7-8 वर्षांपासून वैदयकिय प्रतिपूर्ती देयक प्रलंबित आहेत. अनेक लोकांनी स्वतः चे व कुटुंबाचे उपचारासाठी बँक, सहकारी पतसंस्था या मधून कर्ज काढून उपचार घेतलेत त्यांची प्रतिपूर्ती देयक मंजूर करण्यासाठी 7-8 वर्षाचा कालावधी लागतोय. सेवानिवृत्त झाल्यावर एक वर्षांपासून मासिक पेन्शन मिळत नाही, उपदान व पेन्शन विक्री रक्कम आणि भ. नी. नी. खात्याची रक्कम तर मिळायला दोन दोन वर्ष लागतात. यामुळे शासनाला नाहक व्याज द्यावे लागते. गट विमा ची रक्कम तर 5-6 वर्ष मिळत नाही. सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी अजून ही मिळाली नाही. सावली पंचायत समिती च्या 86 शिक्षक यांची थकबाकी चे देयक मंजूर काढण्यासाठी मा. मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या कडे गटशिक्षणाधिकारी सावली यांनी जानेवारी 2020 ला मंजुरी साठी प्रस्ताव दाखल केला परंतु शिक्षणाधिकारी प्राथ. यांच्या कार्यालयाकडून टिप्पणीच दाखल आजतागायत झाली नाही.नागभीड पंचायत समिती मध्ये समायोजनात अनियमितता झाली असे संघटनेने निवेदन दिले. शिक्षणाधिकारी प्राथ. जिल्हा परिषद, चंद्रपूर यांनी मान्य करून समायोजन रद्द करून नव्याने समायोजन रद्द करण्यासाठी पत्र दिले परंतु गटशिक्षणाधिकारी नागभीड यांनी पत्राची अंमलबजावणी केली नाही व करणार नाही प्रहार शिक्षक संघटना यांनी ब्रम्हपुरी व नागभीड यांच्या भष्ट्राचार व अनियमितता यांची तक्रार केली. मा. पालकमंत्री महोदय, यांनी सुद्धा पत्राची दखल घेतली. प्रशासनाकडे गटशिक्षणाधिकारी पदाची तक्रार केली. परंतु जिल्हा प्रशासन यांनी त्या गटशिक्षणाधिकारी याच्या कडून त्याची मूळ आस्थापना असलेले पद शालेय पोषण आहार अधीक्षक पदाचा प्रभार काढला व तो प्रभार विस्तार अधिकारी शिक्षण यांच्या कडे दिला. जो गटशिक्षणाधिकारी पदाचा लायक आहे त्याला शालेय पोषण आहार पदाचा प्रभार. शालेय पोषण आहार अधीक्षक गटशिक्षणाधिकारी पदाचा दोन पंचायत समिती चा प्रभारी गटशिक्षणाधिकारी पदाचा कारभारी व विस्तार अधिकारी शिक्षण हा शालेय पोषण आहार अधीक्षक या पेक्षा दुसरी शोकांतिका कोणती असेल. एवढं होऊन ही तो शालेय पोषण आहार अधीक्षक पदाचा प्रभार काढण्यासाठी मा. मुख्यकार्यकारी अधिकारी, चंद्रपूर यांनी दि. 13 जुलै 2020 ला आदेश देऊन ही प्रभार दिला नाही यावरून तो शालेय पोषण आहार अधीक्षक वरिष्ठ अधिकारी यांचा आदेश सुद्धा मानायला तयार नाही तरी प्रशासन गप्प का? अशा एकूण 48 समस्यासाठी प्रहार शिक्षक संघटनांनी दि. 28 ऑगस्ट 2020 ला आंदोलन पूर्व नोटीस प्रशासनास दिले. चंद्रपूर जिल्हा परिषद प्रशासन निगरगट्ट झाले आहे. भाऊ, मला वाटत नाही की, आपण राज्याचे मंत्री म्हणून पत्र दिले, परंतु मी खात्रीपूर्वक सांगतो की, प्रशासन काहीच करणार नाही. प्रशासनाला धाक उरलेले नाही, म्हणून प्रहार पद्धतीने आंदोलन केल्याशिवाय प्रशासन जागे होणार नाही. चंद्रपूर जिल्हा परिषद अंतर्गत एक संघटना ही याच वर्षात सुरवातीला जिल्हा परिषद समोर 23 दिवस उपोषणास बसली होती. त्यांच्या मागण्या याच होत्या. परंतु प्रशासनने कोणतीही मागणी ची पूर्तता केली नाही त्यामुळे भाऊ, आम्हाला प्रहार पद्धतीने मा. महेश ठाकरे, राज्य अध्यक्ष, प्रहार शिक्षक संघटना यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यासाठी आपण परवानगी द्यावी. ही विनंती. आपला स्नेहांकित,

जयदास सांगोडे, जिल्हा अध्यक्ष, प्रहार शिक्षक संघटना, चंद्रपूर दि. 11/09/2020

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *