जिल्हा आरोग्य अधिकारी यांना अश्लील शब्दात शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या आमदारांवर कारवाई करुन हकालपट्टी करा… राज्य नसे॔स संघटनेची मागणी..
मुंबई :- विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. १२ मे २०२१
दिनांक 11/5/2021 ला गडचिरोली जिल्हयाचे जिल्हाधिकारी आदरणीय दिपक सिंगला याना निवेदन सादर करून आम. रणजित कांबळे विधानसभा क्षेत्र देवळी यांचेवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे..
याबाबत सविस्तर वृत्त असे की.. आम. रणजित कांबळे यानी वर्धा जिल्हा परिषद चे जिल्हा आरोग्य अधिकारी मा .अजय डवले यांना दुरध्वनी वरून अश्लील शब्दाचा वापर शिवीगाळ करून, जिवंत मारण्याची धमकी दिल्याबद्दल महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद नसे॔स संघटना गडचिरोली,, जिल्ह्यातील नसे॔स सभासद व राज्य नसे॔स संघटना पदाधिकारी यांनी निषेध करून जिल्हा आरोग्य अधिकारी आदरणीय अजय डवले वर्धा यानां योग्य न्याय देण्यासाठी नसे॔स संघटनाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.. निवेदन सादर करतांना संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. सदर निवेदन खंबीर नेतृत्व असलेल्या संघटनेच्या माजी जिल्हाध्यक्ष श्रीमती माया सिरसाट यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले . जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांना निवेदन सादर करतांना संघटनेच्या श्रीमती कल्पना रामटेके कोषागार ,आशा कोकोडे सदस्य मंगला चंदनखेडे उपाध्यक्ष, प्रभारी अध्यक्ष निलू वानखडे ,सचिव ज्योती कांबरे चंपा उईके , विद्या आडे पवार, भारती गोगे राठोड ,मराठी वासणिक सरोदे सुपारे सागरी ऐका पांडे वंदना भारती हेडो कुमरे व जिल्ह्यातील सर्व सभासद व नसे॔स भगिनी, उपस्थित होत्या. वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी कोव्हिड 19 मध्ये जिवाची पर्वा न करता या कोरणा सारख्या माहामारी मधे प्रत्येक गावातील जनतेला उत्तरदायी, उत्कृष्ट आरोग्य सेवा देत आहोत. अशा परिस्थितीत जर लोकांनी किंवा निष्क्रिय राजकारणी लिडरनी काम करणाऱ्या अधिकारी , कर्मचारी आणि इतर आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना विनाकारण अश्लील शब्दात शिवीगाळ केली तर काम करण्याची मानसिकता राहिल तरी कशी?? शासन फक्त आश्वासन देऊन आरोग्य कर्मचाऱ्यांकडून काम काढून घेत आहे.आता सर्व नसे॔स भगिनींनी संघटीत होऊन एकजुटीने रहाण्याची नितांत गरज आहे. संघर्ष करुन अन्याया विरोधात लढा देऊन आपले हक्क आणि अधिकार मिळवून घेण्याची गरज आहे. अन्यायकारक घटनांचा प्रतिकार करण्यासाठी संघटना सदैव कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. अशी माहिती नसे॔स संघटनेच्या जिल्हाध्यक्ष श्रीमती माया सिरसाट यांनी दिली. आरोग्य सेवा देणाऱ्यां अधिकाऱ्यांना अश्लील शब्दात शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या आ.. कांबळे यांचेवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी कारवाई करावी. कांबळे सारखे आमदार विकास कामात अडसर आहेत.. देश, आणि राष्ट्रीय विकासासाठी बाधक आहेत. त्यामुळे त्यांना तात्काळ पदावरून निष्कासित करण्यात यावे.. अशी मागणी राज्यातील नसे॔स संघटनांनी केली आहे.