जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांकडून ‘श्रीं’चे दर्शन

नागपूर, दि. २ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जिल्हाधिकारी यांच्या ‘राजयोग’ या निवासस्थानी गणेशोत्सवानिमित्त भेट दिली. तसेच श्री गणेशाचे पूजन करुन आरती केली.
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, डॉ. श्रीमती शालिनी आशरी इटनकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी कुमारी आरना इटनकर हिने ‘श्रीं’च्या आरतीमध्ये सहभाग घेतला.
०००