अमरावती महाराष्ट्र हेडलाइन

जिल्हाधिकारी कार्यालयात माध्यम कक्षाची स्थापना जिल्हाधिकाऱ्यांनी केली निवडणूकविषयक विविध कक्षांची पाहणी

Summary

अमरावती, दि. 20 (जिमाका): लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवडणूकविषयक विविध कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज निवडणूक कामजाबाबत स्थापन करण्यात आलेल्या कक्षांना भेट देऊन पाहणी केली. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनातील पहिल्या माळ्यावर जिल्हा माहिती कार्यालयामार्फत […]

अमरावती, दि. 20 (जिमाका): लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवडणूकविषयक विविध कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज निवडणूक कामजाबाबत स्थापन करण्यात आलेल्या कक्षांना भेट देऊन पाहणी केली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनातील पहिल्या माळ्यावर जिल्हा माहिती कार्यालयामार्फत माध्यम सनियंत्रण व प्रमाणिकरण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाला जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी भेट देऊन येथील व्यवस्था व सुविधेची पाहणी केली. या कक्षाच्या लगतच खर्च सनियंत्रण पथक स्थापन करण्यात आले आहे. तसेच या इमारतीतील वाहन व्यवस्था कक्ष, महसूल भवन जवळील आदर्श आचार संहिता विभाग, ग्रामपंचायत विभागाजवळील एक खिडकी कक्ष यांनाही  जिल्हाधिकारी यांनी भेट देऊन पाहणी केली. स्थापन करण्यात आलेल्या विविध कक्षांमार्फत निवडणूकविषयक कामकाज विहित कालावधीत जबाबदारी व पारदर्शक पदध्तीने पार पाडण्याची सूचना श्री. कटियार यांनी यावेळी केली. संबंधित सर्व नोडल अधिकाऱ्यांशी त्यांनी यावेळी संवाद साधला.

आदर्श आचारसंहितेचे नोडल अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी सूरज वाघमारे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, तहसीलदार निलेश खटके, खर्च सनियंत्रण पथकाचे नोडल अधिकारी चंद्रशेखर खंडारे, माध्यम सनियंत्रण व प्रमाणिकरण कक्षाच्या नोडल अधिकारी अपर्णा यावलकर, सहायक माहिती अधिकारी सतीश बगमारे, खर्च सनियंत्रण पथकाचे सहायक नोडल अधिकारी विजय देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.

*****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *