महाराष्ट्र हेडलाइन

*जिजामाता साखर कारखाना विकू देणार नाही : रामेश्वर पवळ* माजी आमदार स्व. शंकरराव देशमुख खरे सहकार महर्षी.

Summary

प्रतिनिधी | बुलडाणा माजी आमदार स्व. शंकरराव देशमुख हेच खरे सहकार महर्षी. १८ मार्चला त्यांची पुण्यतिथी. जिल्ह्यात त्यांनीच सहकाराचा पाया घातला. विदर्भातील सहकारी तत्त्वावरचा पहिला जिजामाता सहकारी साखर कारखाना दुसरबीडला त्यांनीच सुरु केला. नंतरच्या काळात चुकीच्या लाेकांच्या हातात सुत्रे गेल्यामुळे […]

प्रतिनिधी | बुलडाणा
माजी आमदार स्व. शंकरराव देशमुख हेच खरे सहकार महर्षी. १८ मार्चला त्यांची पुण्यतिथी. जिल्ह्यात त्यांनीच सहकाराचा पाया घातला. विदर्भातील सहकारी तत्त्वावरचा पहिला जिजामाता सहकारी साखर कारखाना दुसरबीडला त्यांनीच सुरु केला. नंतरच्या काळात चुकीच्या लाेकांच्या हातात सुत्रे गेल्यामुळे हा कारखाना बंद पडला. आता हा कारखाना विकण्याचे मनसुबे आखण्यात येत आहे. जीव गेला तरी राजमाता माँ साहेब जिजाऊंच्या नावाने सुरु झालेला हा कारखाना विकू देणार नाही, अशी आक्रमक भुमिका राष्ट्रवादीचे नेते रामेश्वर पवळ यांनी घेतली आहे.
पवळ म्हणाले की, या कारखान्याच्या उभारणीत अनेकांचे कष्ट आहेत. सहकारमहर्षी स्व. शंकरराव देशमुख साहेबांनी या कारखान्याला राजमाता जिजाऊ यांचे नाव दिले. गाेरगरिबांच्या भागभांडवलातून १९७२ ला हा कारखाना सुरू झाला. या कारखान्याच्या माध्यमातून हजाराे बेराेजगार लाेकांच्या हाताला काम मिळाले. पण सहकारमहर्षी स्व. शंकरराव देशमुख साहेबांनंतर काही चुकीच्या माणसांच्या हातात सुत्रे गेल्यानंतर हा कारखाना बंद पडला. अनेकांचे संसार उघड्यावर आले. साखर कारखान्याची यंत्र सामुग्री, मशिनरीसह मालकीची जवळपास १७५ एकर शेती आहे. त्यावर काही जणांचा डाेळा आहे. त्यामुळे राजमाता जिजाऊ यांच्या नावाने सुरु झालेला हा कारखाना पुन्हा सुरु करण्यासाठी राज्य शासनाने एक समिती नेमावी. त्यापासून राजकीय नेत्यांना दूर ठेवावे. तसेच या समितीला तत्काळ १०० काेटी रुपयांचे अनुदान द्यावे. हा कारखाना सुरू असताना जे कर्मचारी काम करत होते तसेच ज्यांनी कमी किंमतीत आपल्या जमिनी दिल्या त्यांच्या वारसदारांना या कारखान्यात प्राधान्याने नोकरी द्यावी असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
आपला विश्वासू ,
रामेश्वर पवळ

गडचिरोली
जिल्हा प्रतिनिधी
प्रा शेषराव येलेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *