BREAKING NEWS:
गडचिरोली महाराष्ट्र हेडलाइन

जाती दावा पडताळणीबाबत व्यावसायीक पाठ्यक्रमात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थानी व निवडणुक उमेदवारांकरीता त्रृटी पूर्तते करीता विशेष मोहीम

Summary

गडचिरोली, (जिमाका) दिनांक 22/10/2021 : २०२०-२१ या शैक्षणिक सत्रामध्ये १२ विज्ञान शाखेतील य तसेच २०२१-२२ या सत्रात व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेशास पात्र असलेल्या विद्यार्थांनी तसेच मार्च – २०२१ मध्ये निवडणुकीत विजयी झालेले (अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इमाव व विमाप्र […]

गडचिरोली, (जिमाका) दिनांक 22/10/2021 : २०२०-२१ या शैक्षणिक सत्रामध्ये १२ विज्ञान शाखेतील य तसेच २०२१-२२ या सत्रात व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेशास पात्र असलेल्या विद्यार्थांनी तसेच मार्च – २०२१ मध्ये निवडणुकीत विजयी झालेले (अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इमाव व विमाप्र ) उमेदवारांनी जाती दावा पडताळणीचे प्रस्ताव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गडचिरोली येथे सादर केलेले आहेत परंतु ज्यांना अद्याप पयंत ई-मेल व्दार जात वैधता प्रमागपत्र मिळालेली नसल्यास सदर प्रस्तावामध्ये जाती दावा सिध्द करणारे सबळ पुरावे नसल्याने त्यांचे प्रकरण त्रृटीमध्ये असल्याने त्यांना यापुर्वी दुरध्वनी, भ्रमणध्वनी व पत्राव्दारे त्रृटी पूर्तता करणेसंदर्भात कविण्यात आले आहे.

मात्र ज्या अर्जदारांनी व निवडणुक उमेदवारांनी अद्यापही त्यांचे जाती दावे पडताळणी संबंधीत आवश्यक ते मानीव दिनांकापुर्वीचे जातीचे व वास्तव्याच्या नोंदीचे पुरावे सादर केलेले नाहीत. अशा अर्जदारांना व निवडणुक उमेदवारांना त्रुटी पुर्ततेकरीता संधी देण्यात येत असून, त्यांनी त्रृटी पुर्तते बाबत आवश्यक ते पुरावे मुळ प्रतीसह दि.२६ ऑक्टोंबर २०२१ रोजी मंळवारला सादर करणेसाठी कळविण्यात आले आहे. त्रुटीपुर्ततेकरीता सबळ पुराव्यासह समिती कार्यालयात उपस्थित राहावे.

तसेच ज्या अर्जदारांचे जात वैधता प्रमाणपत्र तयार होऊनही ज्यांनी अद्याप समिती कार्यालयात जमा असलेली मुळ जात प्रमाणपत्र नेलेले नाही, त्यांचे पालक वा सख्खे भाऊ, बहिन यांनी अर्जादाराने व स्वत:चे ओळखपत्र (मुळ व झेरॉक्स), जातवैधता प्रमाणपत्राची झेरॉक्स घेऊन तात्काळ मुळ जात प्रमाणपत्र प्राप्त करावे असे उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती गडचिरोली देवसुदन धारगांवे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *