महाराष्ट्र हेडलाइन

जातीव्यवस्थेचे मानसिक परिणाम’ ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन-

Summary

चंद्रपूर :- प्रतिनिधी दि 12 जून 2021:- लोकायत व युवा बिरादारी द्वारा आयोजित ‘व्यातीव्यवस्थेचे मानसिक परिणाम’ या विषयावर ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन रविवार, दि. 13 जून 2021ला संध्या. 6 वाजता करण्यात आले आहे. भदन्त विमलकित्ती गुणसिरी (संस्थापक संचालक : महानाग साक्यमुनि […]

चंद्रपूर :- प्रतिनिधी दि 12 जून 2021:-
लोकायत व युवा बिरादारी द्वारा आयोजित ‘व्यातीव्यवस्थेचे मानसिक परिणाम’ या विषयावर ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन रविवार, दि. 13 जून 2021ला संध्या. 6 वाजता करण्यात आले आहे. भदन्त विमलकित्ती गुणसिरी (संस्थापक संचालक : महानाग साक्यमुनि विज्जासन (बुद्धिस्ट सेमिनरी)) हे या व्याख्यानाचे व्याख्याते आहेत. जातीव्यवस्था आपल्या समाजाचं वास्तव्य असुन या व्यवस्थेच्या उतरंडीत सवर्ण श्रेष्ठ तर दलित कनिष्ठ आहेत. विभागणीमुळे तथाकथित सवर्णांना मान-सन्मान व आदर मिळतो तर दुसरीकडे दलितांना आयुष्यभर अपमान, भेदभाव आणि हिंसा सहन करावी लागते.
व्यवस्था तथाकथित सवर्णांना श्रेष्ठता व अहंकाराची भावना देते तर दुसरीकडे दलितांचा आत्मविश्वास नष्ट करून न्यूनगंडात ढकलते. जातीच्या आधारावर स्वतःला श्रेष्ठ समजणारे सवर्ण आणि स्वतःला कनिष्ठ समजणारे दलित दोघेही माणूसपणापासून दूर जातात आणि जातिव्यवस्थेचे गुलाम बनतात. सामाजिक आणि आर्थिक शोषणाबरोबरच जात मानसिक शोषणही करत असते. जातीव्यवस्थेचे मानसिक परिणाम काय आहेत? ती आपल्यावर कसा प्रभाव पाडते हा जातिअंताच्या लढ्यातील एक महत्त्वाचा पैलू आहे. त्यासाठीच या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या लाईव्ह व्याख्यानाचा लाभ घेण्यासाठी http://tiny.cc/talk13june या लिंक वर नोंदणी करावी किंवा facebook.com/lokayat.india

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *