BREAKING NEWS:
नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

जातीय सलोखा, एकता व बंधुतेचा संदेश कोंढाळीत जीवन आधार बहुउद्देशीय संस्था व श्री संत गजानन महाराज नगरी चे वतीने इफ्तार पार्टी चे आयोजन इफ्तार पार्टीत देशाच्या सुख शांती, बंधुभावा साठी प्रार्थना केली

Summary

प्रतिनिधी – कोंढाळी जीवन आधार बहुउद्देशीय सामाजिक संस्था नागपूर व श्री संत गजानन महाराज नगरी कोंढाळी चे अध्यक्ष जीवन जंवजाळ यांचे वतीने येथील विकास नगर येथील महमदिया मशिदीच्या परिसरात इफ्तार पार्टी आयोजन केल्या गेले. इफ्तार पार्टीमध्ये शेकडो रोजेदार (उपवास करनारे)आणि […]

प्रतिनिधी – कोंढाळी जीवन आधार बहुउद्देशीय सामाजिक संस्था नागपूर व श्री संत गजानन महाराज नगरी कोंढाळी चे अध्यक्ष जीवन जंवजाळ यांचे वतीने येथील विकास नगर येथील महमदिया मशिदीच्या परिसरात इफ्तार पार्टी आयोजन केल्या गेले. इफ्तार पार्टीमध्ये शेकडो रोजेदार (उपवास करनारे)आणि लोकप्रतिनिधी सहभागी झाले . इफ्तार पार्टीमध्ये जातीय सलोखा, सामाजिक आणि धार्मिक बंधुता दिसून आली. सर्व समुदायाच्या लोकांनी एकत्र बसून इफ्तार केली. यावेळी इफ्तार पार्टीला उपस्थित असलेल्यांनी देशात शांती, सौहार्द आणि सद्भावना नांदावी यासाठी प्रार्थना केली. महंमदिया मशिदीचे मौलाना इक्बाल अहमद म्हणाले की, स्थानिक श्री संत गजानन महाराज नगरी आणि जीवन आधार बहुउद्देशीय सामाजिक संघटनेचे अध्यक्ष यांनी इफ्तारचे आयोजन केले होते. इफ्तार आयोजित करणाऱ्या व्यक्तीलाही रोजेदारांइतकेच (उपवास करणाऱ्या व्यक्तीइतकेच) पुण्य मिळेते. महंमदिया मश्जिद कमेटी चे अध्यक्ष शेख नूर महंमद. व सचीव तन्वीर शेख ‌सह समितीच्या सर्व अधिकाऱ्यांनी आणि सदस्यांनी इफ्तार पार्टीच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *