BREAKING NEWS:
क्राइम न्यूज़ भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

जातीयवादी ठाणेदार तसेच स्पृश्य हिंदू बिट जमादार यांच्या मुळे आंबेडकर वार्ड येथील कायदा व सुव्यवस्था वारंवार का बिघडते?

Summary

प्रतिनिधी वरठी:- दिनांक १४-११-२०२३ रोजी वरठी येथील मराठा ठाणेदार अभिजित पाटील यांनी आंबेडकर वॉर्ड येथील प्रतिष्ठित नागरिक सामाजिक कार्यकर्ता अमर वासनिक यांच्यावर यादव समाजाच्या ड्रग डीलर च्या हातून तलवारीने आत्मघाती हमला करवला. व यादव समाजाची असलेल्या त्याच्या आईच्या हातून एफ.आय.आर. […]

प्रतिनिधी वरठी:- दिनांक १४-११-२०२३ रोजी वरठी येथील मराठा ठाणेदार अभिजित पाटील यांनी आंबेडकर वॉर्ड येथील प्रतिष्ठित नागरिक सामाजिक कार्यकर्ता अमर वासनिक यांच्यावर यादव समाजाच्या ड्रग डीलर च्या हातून तलवारीने आत्मघाती हमला करवला. व यादव समाजाची असलेल्या त्याच्या आईच्या हातून एफ.आय.आर. दाखील केली. नंतर चार्जशीट दाखल करून कोर्टात दाखल केले. दरम्यान अमर वासनिक यांच्या कार्यालयाचे विजेचे दिवे रातोरात फोडले जात असायचे. अमर वासनिक यांच्या वर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या गुंडांच्या हातून हमले तसेच धमक्या ह्या चालूच होत्या. आंबेडकर वॉर्ड येथील अनुसूचित जातीतील गुंड लोकांना अनुसूचित जातीतील प्रतिष्ठित व्यक्तींवर हमले करवणे हे चालूच होते. दिनांक २१-०१-२०२४ रोजी पुन्हा यादव समाजाच्या गुंड ने अनुसूचित जातीतील प्रतिष्ठित व्यापाऱ्यांकडून तलवारीच्या धाकावर अवैध वसुली करताना रेल्वे गेट समोर गाडीच्या काचा फोडण्यात आल्या. तो प्रकार वरठी येथील जमावाणे बघितला पण साक्ष देण्याची कुणाची हिम्मत देखील झाली नाही.
वरठी येथील आंबेडकर वार्ड परिसरात रात्रीचे ११:०० वाजता वारंवार तलवारी ह्या निघतच असतात.
आज दिनांक २९-०२-२०२४ रोजी सायंकाळी ०५:५० वाजता पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क चे कार्यालय अमर कॉम्पुटर सेंटर वर आंबेडकर वॉर्ड येथील गुंड विक्की साहूकार उर्फ विक्की अशोक गणवीर ने विटा फेकून मारल्या त्यामुळे कार्यालयाची संपूर्ण काचे फुटली तसेच आतील सुद्धा काचे फुटली. तसेच प्रिंटर चे सुद्धा नुकसान झाले. यामुळे कार्यालयाचे एकूण १५ ते २० हजारांचे नुकसान झाले.
विक्की साहूकार ने पुन्हा येऊन कार्यालयातील अमर वासनिक यांना आपल्या गँग गुंडांच्या हातून खत्म करण्याची धमकी दिली.
प्रस्तुत घटनेची तक्रार अमर वासनिक यांनी पोलिस स्टेशन येथे केली असता वरठी पोलिसांनी अदखल पात्र गुन्ह्याची नोंद केली.
म्हणजे आंबेडकर वॉर्ड येथील अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जनजातींच्या प्रतिष्ठित नागरिकांनी चिडावे व कायदा व सुव्यवस्था प्रस्तुत प्रतिष्ठित नागरिकांच्या हातून बिघडावी याची वाट जातीय वादी ठाणेदार अभिजित पाटील तसेच बिट जमादार कोमल रोहाडकर बघत असल्याचा आरोप अमर वासनिक यांनी या दोघांवर केला आहे.

वरठी येथील हनुमान वॉर्ड, शास्त्री वॉर्ड, जगनाडे चौक, नेहरू वॉर्ड, गांधी वॉर्ड इतर वॉर्डातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत चालू असून तिथे शांती व आंबेडकर वार्ड येथे अशांती आहे या समस्यांना जिम्मेदार वरठी येथील मराठा ठाणेदार अभिजित पाटील तसेच बिट जमादार कोमल रोहडकर असल्याचा आरोप अमर वासनिक यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *