BREAKING NEWS:
नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

जागतिक वैभव प्राप्त नागपूरी संत्रा हळूहळू नामशेष होणार कां? कृषी मित्र दिनेश ठाकरे

Summary

काटोल – मागील एक दोन वर्षांत अशा काही घटना ऐकल्या कि आता नागपूरी संत्रा हळूहळू नामशेष होणार कां? असं वाटतं.कारण जेव्हा एक संत्रा बागायतदार वैतागून संत्रा बाग जेसीबीने काढून टाकतो तर कुणी तावातावाने हाती कुर्हाड घेऊन संत्र्याची झाडं तोडतो तेव्हा […]

काटोल – मागील एक दोन वर्षांत अशा काही घटना ऐकल्या कि आता नागपूरी संत्रा हळूहळू नामशेष होणार कां? असं वाटतं.कारण जेव्हा एक संत्रा बागायतदार वैतागून संत्रा बाग जेसीबीने काढून टाकतो तर कुणी तावातावाने हाती कुर्हाड घेऊन संत्र्याची झाडं तोडतो तेव्हा कुठं तरी गंभीर होऊन संत्रा बागायतदारांचा विषय जिव्हाळाने हाताळण्याची वेळ आली आहे.अन्यथा खरोखरच आपला गौरवशाली, ऐतिहासिक,परंपरेतला नागपूरी संत्रा नामशेष होणार ,असं आम्ही ‘कृषिमित्र प्रतिष्ठान’च्या माध्यमातून ८ वर्षापासुन सतत बागायतदारांना जागरूक करुन त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी नियमित चर्चासत्रे, कार्यशाळा शेतावर आयोजित करीत आहोत.शेतकर्यांच्या समस्या जरी जिव्हाळाने हाताळण्याची आपण मागणी करतो परंतू जागतिक खुल्या बाजारपेठेत आपण स्पर्धा करण्यात कुठे कमी पडतो हा विचार सुद्धा आपण स्वतः शेतकरी, बागायतदारांनी नक्कीच करण्याची वेळ आलेली आहे.
आपल्या नागपुरी संत्र्याची जी विशिष्ट आंबट,गोड चव आहे आणि त्याकरिता नागपूरी संत्र्याला जागतिक बाजारपेठेत भौगोलिक मानांकन प्राप्त झाले.परंतू असा उपयोग जास्तीत जास्त ‘टेबल फ्रूट’ म्हणून होतो.परंतू फळे तोडल्यावर यांची ‘keeping quality ‘देखभाल गुणवत्तेची वेळ फार कमी असल्याने जागतिक बाजारपेठेतील स्पर्धेत आपण फार मागे राहतोय.
मग आपण प्रक्रिया उद्योगाचा जेव्हा विचार करतो तेव्हा यातील कडवट बियांचे प्रमाण आणि सालीचा विचार केला तर लक्षात येईल की ‘ज्यूस’ साठी मोसंबी अधिक योग्य आणि फायदेशीर आहे.यासाठी अनेक बागायतदारांनी ग्रेप फ्रूट,व्हेलेंशिआ सारखें पर्याय शोधून लागवड करण्यास सुरुवात केली आहे.यामध्ये सह्याद्री फाऊंडेशन,जैन इरिगेशन सारख्या संस्था सुद्धा बागायतदारांसाठी ,अनेक प्रयोग त्यांच्या प्रक्षेत्रावर करित‌ आहे याचा आनंद आहे.
जेव्हा मी असं ऐकलं होतं कि ‘आरेंज ज्यूस’याचं यू.एस.बाजारात कमोडिटी एक्सचेंज मध्ये ट्रेडींग होते, त्यासारखे प्रयोग भविष्यात आपण आपल्या ‘एनसीडीएक्स’बाजारात ट्रेडींग करण्याचे प्रयत्न करुय.पण यासाठी मात्र आपल्या वातावरणात भरपूर रस असणार्या मोसंबीच्या जाती शास्त्रज्ञांनी संशोधीत करुन उत्पादन वाढविण्याची‌ गरज आहे.
यापूर्वी मी संत्रा फळांचा मुख्य उपयोग ‘टेबल फ्रूट’ म्हणून जरी म्हटले परंतू आपल्या फळाला‌ आपण किती महत्त्व देतो याचा थोडा विचार आपण स्वतः नक्कीच केला पाहिजे.आपल्या स्वतःच्या बागेतला चांगला गुणवत्तापूर्ण माल दिल्यानंतर शिल्लक राहिलेला कमी प्रतीचा माल आपण घरी वापरतो किंवा वानगीदाखल सुद्धा असाच माल आपण आप्तेष्टांना वाटतो.आपल्या लोकल बाजारात,एस.टी.स्टैंड, रेल्वे स्टेशनवर सुद्धा अशाच कमी प्रतीच्या मालाची रेलचेल दिसतें.तेव्हा बाहेरुन आलेल्या व्यक्तींना मोठ्या उत्साहाने आपल्या भागातील संत्री खाण्याची ईच्छा झाली आणि त्यांच्या वाट्याला असा कमी प्रतीचा माल आला तर आपल्या नागपुरी संत्रा बद्दल त्यांचे काय मत बनेल ?आपल्या भागात अनेक ज्यूस सेंटर असतील तेव्हा आपणच विचार करा कि आपण जसा एपल,पाईनेपल,उस,बीट,एलोव्हेरा किंवा मोसंबी अशा ईतर फळांचा ज्यूस घेतो परंतू संत्राचा ज्यूस घेणे टाळतो.मग कुण्या पेशंटला हास्पीटल मध्ये भेटायला गेलो तरी एपल घेऊन जातो तसे संत्रा मात्र घेऊन जाणे कटाक्षाने टाळतो. तेव्हा श्रीलंका, बांगलादेश,दूबई यांच्याकडून यापुढे किती अपेक्षा आपण ठेवणार?हा विचार प्रत्येक बागायतदारांनी जबाबदारीने स्वतः करण्याची वेळ आहे.
आता आपण संत्र्याच्या सालीबद्दल बोलू ,मला आठवतंय पूर्वी गावातील महिला संत्र्याच्या साली गोळा करुन उन्हात वाळवून त्याचा केस धुण्यासाठी किंवा सौंदर्य प्रसाधन म्हणून उपयोगात आणायच्या कारण त्यांना त्यातले औषधीय गुणधर्म कळाले होते.
संत्रा सालीत लिमोनीन नावाचा महत्त्वपूर्ण औषधी घटक जो एंटीआक्सीडंट म्हणून सूक्ष्म जिवाणू विरोधी तसेच शरीराच्या सुजेवर काम करतो.
तसेच सालीतला दुसरा घटक लिनेलूल हा ताणतणावाविरुद्ध काम करतो आणि एरोमाथेरेपी मध्ये याचा उपयोग होतो.
तसेच वाय टरपीनीन मध्ये एंटीआक्सीडंट सह बुरशी विरोधी गुणधर्म आहेत.
तसेच अल्फा आणि बीटा पायनीन यांचा श्वसनाचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत मिळते.
तसेच संत्र्याच्या सालीमध्ये असणारे महत्वपूर्ण फ्लेव्होनाईडस बद्द्ल माहीती घेऊ.यामध्ये असणारा हिस्पीरीडीन हा घटक ह्रदयाचे आरोग्य उत्तम ठेवण्यात मदत करतो.
यामध्ये असणारा नोबाईलिटीन हा मधूमेह,स्थूलपणा आणि काही मानसिक आजारांमध्ये काम करतो.
यामध्ये अजून असणारा एक घटक टेंगीरीटीन यामध्ये कर्करोग विरोधी गुणधर्म आहेत.
तसेच क्वेरसिटीन या घटकामध्ये रोगप्रतिकारक्षमता मजबूत करण्याचे गुणधर्म आहेत.
तसेच संत्र्याच्या सालीत‌ काही महत्वपूर्ण फ्लेव्होनाईडस जसे केफैक एसीड,क्लोरोजेनीक एसीड,फेरुलीक एसीड यामध्ये एंटीआक्सीडंट सह सूजनविरोधी, रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी तसेच त्वचा आणि ह्रदय विकारात फायद्याचे ठरतात.
तसेच सालीत असणारे फायबर‌ आणि पेक्टीन पचन विकारांमध्ये आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करते.
तसेच संत्र्याच्या सालीत व्हिटॅमिन ए आणि सी तसेच केल्सिएम
आणि पोटेसिएम जे हाडांसाठी आणि ह्रदयाचे कार्य व्यवस्थित राहण्यासाठी मदतीचे ठरते.
आता आपण संत्र्यातील कडवट बिया ज्या आपल्याला प्रक्रिया उद्योगात महत्वाची बाधा ठरते.पण यांमध्ये असणार्या महत्वपूर्ण औषधी गुणधर्माकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही तर त्यापासून सुद्धा काय निर्मिती करता येईल जेणेकरून आपल्या फळाकडून प्रत्येक भागांत असणार्या उपयोगी गुणधर्माकडून फळांचे मूल्य अधिक वाढवण्यासाठी भर देऊ.
तर संत्र्याच्या बियांतसुद्धा‌ महत्वपूर्ण औषधी घटक लिमोनीन आहे ज्याचे फायदे आपणांस सांगितले आहे.
दुसरा घटक मायरसिन जो स्नायू साठी आरामदायी प्रभावी ठरतो.
संत्र्याच्या बियांमध्ये काही महत्वपूर्ण फैटी एसिड आहे ज्यामध्ये ओमेगा-6,ओमेगा-9 आणि पामिटीक एसिड आहे जे ह्रदय,मेंदू पेशीची कार्यक्षमता वाढविण्यासाठी तसेच त्वचेचे आरोग्य उत्तम राहून‌ शरीरास भरपूर उर्जा प्रदान करते.
बियांतून सुद्धा हिस्पीरीडीन मिळते ज्यामुळे ह्रदयाचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत मिळते ,असे आधीच सांगितले आहे.
पून्हा एक घटक नेरींजीन जो लिव्हर आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करते.
संत्र्याच्या बियांमध्ये काही शरीरास आवश्यक प्राथिने आणि अमिनो ऍसिड आहेत तसेच मेग्नेसियम आणि फास्फोरस सारखे खनिजे शरीराचे स्नायू दुरुस्ती करुन आराम मिळतो तसेच मेंदूचे कार्य आणि हाडे बळकट होण्यासाठी फायदेशीर ठरते.
तसेच बियांमध्ये एक महत्वाचा टोकोफेरोल नावाचा व्हिटॅमिन ई चा संयूग आढळतो जो त्वचेचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत करते.
तर शेतकरी मित्रांनो, संत्रा बागायतदारांनो कुठवर आपण संत्रा प्रक्रिया प्रकल्प म्हटलं कि फक्त ज्यूस आणि पावडर चा विचार करायचा.ज्या बिया आणि साली त्यांच्या कडवटपणा मूळे आपण फेकून देतो आणि प्रक्रिया उद्योगातही हीच फार मोठी अडचण म्हणून त्यांचा तिरस्कार करतो. परंतू याबाबत जी माहिती आपणास आता सांगितली त्यावरुन तर आपणास संत्रा पेक्षाही बिया आणि साली यांचे फायदेशीर महत्व पटले असेल. तेव्हा यापुढे एक Value Addition म्हणून प्रक्रिया उद्योगात यांची महत्त्वाची भूमिका ठेवण्याचा प्रयत्न करूया.
आदरणीय नितीनजी गडकरी साहेब आणि आदरणीय देवेन्द्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पुढाकाराने पुन्हा एकदा नागपूरी संत्र्याला त्याचे‌ गतवैभव प्राप्त करुन देऊ.धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *