जवाहर गुरुकुल येथे स्वातंत्र्य दिन सोहळा थाटात संपन्न
Summary
नागपूर नंदनवन येथील जवाहर गुरुकुल उच्च प्राथमिक शाळा, जवाहर गुरुकुल विद्यालय, जवाहर गुरुकुल इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने ७६ वा स्वतंत्र दिन सोहळा मोठ्या थाटात उत्साहाने संप्पन झाला.या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी निरामय हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर निलेश चांगले […]

नागपूर नंदनवन येथील जवाहर गुरुकुल उच्च प्राथमिक शाळा, जवाहर गुरुकुल विद्यालय, जवाहर गुरुकुल इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने ७६ वा स्वतंत्र दिन सोहळा मोठ्या थाटात उत्साहाने संप्पन झाला.या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी निरामय हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर निलेश चांगले उपस्थित होते. विशेष अतिथी प्रसिद्ध उद्योजक श्री देवेंद्रजी काटे उपस्थित होते. तर श्री शास्त्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय अशोक मानकर माजी आमदार हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर निलेश चांगले यांनी आपल्या भाषणात *राष्ट्र सुंदर बनवण्याचे कार्य फक्त शाळाचं करू शकते* असे सांगितले तर श्री देवेंद्र काटे यांनी आपल्या भाषणात *आदर्श व्यक्ती घडविण्याचे कार्य शिक्षक करतात* असे सांगितले.अद्ययावत शिक्षण प्रणाली लक्षात घेता गुरुकुलात *डिजिटल क्लासरूम* चे उदघाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.श्री शास्त्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री अशोकजी मानकर यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचे शाल व श्रीफल देऊन सत्कार करण्यात आले.
अध्यक्ष भाषणात श्री.अशोकजी मानकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना वी भी जी बद्दल माहिती दिली.14 ऑगस्ट पहिल्यांदाच माननीय पंतप्रधान मोदी यांनी साजरा केला असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. विद्यार्थ्यांची भाषणे झाली. प्रास्ताविक भाषणात जवाहर गुरुकुल इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य संजय रक्षिये यांनी मातृभूमी चे महत्त्व सांगितले. संचालन सौ.पौर्णिमा भोसले तर आभार सौ.सुनीता येरपुडे यांनी केले. कार्यक्रमात शास्त्री शिक्षण संस्थेच्या सदस्या व गुरुकुलाच्या पालक सौ.प्रगती मानकर, संस्थेच्या सदस्या व जवाहर गुरुकुल इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या संचालिका सौ.अंकिता मानकर-वैद्य, जवाहर गुरुकुल उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संजय निंबाळकर, जवाहर गुरुकुल विद्यालय शाळेचे मुख्याध्यापक माधव मेटांगे, उपप्राचार्या कांचन तिवारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ काकडे, सौ.रक्षिये, सौ. बोधे,सौ.खरे, सौ.कुराटकर, श्री. राठोड, श्री. चापले,श्री. कुळकर्णी, श्री गुर्वे,रवी नगरारे,विजय आसरे,आकाश कोकाटे व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम गीताने झाली.