BREAKING NEWS:
महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात डॉ. भालचंद्र मुणगेकर यांची उद्या मुलाखत

Summary

मुंबई. दि. २ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘महापरिनिर्वाणदिना’निमित्त ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक व आर्थिक विचार’ या विषयावर अर्थशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे अभ्यासक डॉ. भालचंद्र लक्ष्मण मुणगेकर यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत मंगळवार दि. ३ […]

मुंबई. दि. २ माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात महापरिनिर्वाणदिना’निमित्त ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक व आर्थिक विचार’ या विषयावर अर्थशास्त्रज्ञशिक्षणतज्ज्ञ तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे अभ्यासक डॉ. भालचंद्र लक्ष्मण मुणगेकर यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत मंगळवार दि. ३ डिसेंबर २०२४ रोजी रात्री ८.०० वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अर्थशास्त्रज्ञतत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी समाजातील प्रत्येक घटकाच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून देशाची राज्यघटना लिहिली, देशाला एक सर्वंकष संविधान दिले. देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार‘ असेही संबोधले जाते. त्याअनुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अमूल्य कार्याबद्दल डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात माहिती दिली आहे.

तसेच महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवरही मुलाखत प्रसारित होणार आहे.  निवेदिका सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *