जय जय महाराष्ट्र माझा…… महाराष्ट्र राज्याचा ६५व्या स्थापना दिनी कोंढाळीत ध्वजारोहण
Summary
कोंढाळी- वार्ताहर जय -जय -महाराष्ट्र माझा.. गर्जा महाराष्ट्र माझा…के राज्य गीताच्या निनादात महाराष्ट्र राज्याचा ६५वा स्थापना दिनी ०१ मे २०२४ रोजी कोंढाळी येथील शासकीय कार्यालयात सकाळी ७-०० वाजे पसून ७-१५पर्यंत संबंधित विभागाचे प्रमुखांचे हस्ते शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले. महाराष्ट्र राज्याचा […]
कोंढाळी- वार्ताहर
जय -जय -महाराष्ट्र माझा.. गर्जा महाराष्ट्र माझा…के राज्य गीताच्या निनादात
महाराष्ट्र राज्याचा ६५वा स्थापना दिनी ०१ मे २०२४ रोजी कोंढाळी येथील शासकीय कार्यालयात सकाळी ७-०० वाजे पसून ७-१५पर्यंत संबंधित विभागाचे प्रमुखांचे हस्ते शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले.
महाराष्ट्र राज्याचा ६५वा स्थापना दिन आज १ मे २०२४ रोजी राज्यभर साजरा होत असून लोकसभा निवडणुकी दरम्यान घालून दिलेल्या आदर्श आचारसंहिता नुसार महाराष्ट्र दिन एक मे रोजी
कोंढाळी येथील पोलीस कवायत मैदानावर कोंढाळीचे ठाणेदार राजकुमार त्रिपाठी,
येथील नायब तहसीलदार कार्यालयात नायब तहसीलदार संजय राऊत भुजाडे, वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालय-वनपरिक्षेत्र अधिकारी निशिकांत कापगते, नगर पंचायत कार्यालय -प्रशासकिय अधिकारी गौरव लोंदे, आर बी व्यास कला- वाणिज्य महाविद्यालय-प्राचार्य राजू खरडे, प्राथमिक आरोग्य केंद्र कोंढाळी वैद्यकीय अधिकारी डॉ आशिष तायवाडे, तसेच सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात आदर्श आचारसंहितेचे नियमावली नुसार संबधीतीत खाते प्रमुखांनी एक मे महाराष्ट्र दिनाचे प्रसंगी जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा … चे गायनात शासकिय ध्वजारोहण संपन्न झाला.