क्राइम न्यूज़ भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

जनहितार्थ करण्यात येणाऱ्या माहिती अधिकाराचे अर्थात माझ्या मौलिक अधिकारांचे हनन केल्याचा आरोप – अमर वासनिक

Summary

गणेश सोनपिंपळे / जिल्हा प्रतिनिधी भंडारा            सविस्तर वृत्त्त असे की लोकशक्ती भ्रष्टाचार विरोधी सामाजिक संघटनेचे प्रदेश महासचिव श्री अमर भालचंद्र वासनिक रा. आंबेडकर वॉर्ड, वरठी, तह. मोहाडी, जि. भंडारा यांनी भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयात वरठी पोलीस […]

गणेश सोनपिंपळे / जिल्हा प्रतिनिधी भंडारा

           सविस्तर वृत्त्त असे की लोकशक्ती भ्रष्टाचार विरोधी सामाजिक संघटनेचे प्रदेश महासचिव श्री अमर भालचंद्र वासनिक रा. आंबेडकर वॉर्ड, वरठी, तह. मोहाडी, जि. भंडारा यांनी भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयात वरठी पोलीस स्टेशन वर दिनांक १४-०७-२०२३ रोजी ऑनलाईन माहिती अधिकार अर्ज केला होता. प्रस्तुत अर्जामध्ये
प्रति
जनमाहिती अधिकारी,
पोलीस स्टेशन वरठी,
तह. मोहाडी, जि. भंडारा

विषय: वरठी पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात अनेक बेवारस वाहने असून कागदपत्रे सादर न झालेली वाहने, तसेच गाडी चोरांकडून जप्त केलेली वाहने, तसेच पोलीस स्टेशन च्या आसपास पडलेल्या परंतु पोलिसांच्या ताब्यात असलेल्या सर्व दुचाकी व चारचाकी वाहनांची खालील माहिती मिळणे बाबद,

आवश्यक असलेल्या माहितीचा तपशील व कालावधी:- आपल्या पोलीस स्टेशन च्या ताब्यात घेतलेली, जप्त केलेली, मूळ कागदपत्रे सादर न होऊ शकलेली, बेवारस मिळालेली, तसेच गाडी चोरांकडून पोलिसांनी ताब्यात घेतलेली, एकूण अनेक दुचाकी वाहने व इतर वाहने आहेत. या वाहनांची संख्या, आरटीओ नी दिलेले वाहन नंबर, प्रत्येक वाहनांचा इंजिन नंबर, चेसिज नंबर, वाहनांच्या प्रोडक्शन कंपनीचे नाव, अशी माहिती द्यावी. सन २०१९ ते सन २०२३ च्या दरम्यान अनेक चोरीची वाहने आपल्या पोलिसांनी पकडुन आपल्या ताब्यात घेतली आहेत. याचा प्रत्येक वर्षाची संख्या द्यावी. त्यातील अनेक वाहने पोलिसांनी मूळ मालकांना परत दिली आहेत. याची संख्या द्यावी.

हव्या असलेल्या माहितीचे स्वरूप:- पीडीएफ(pdf file)

माहिती ईमेलने देण्याची कृपा करावी.

(शासन निर्णय संकेतांक:२०१७१११७११३२२९३००७ अन्वये अर्ज प्राप्त झाल्यापासून १० दिवसात माहितीसाठी कळवावे.)

प्रस्तुत माहिती ही ३० दिवसांच्या आत देण्याची कृपा करावी.
प्रस्तुत माहिती ही किमान शुल्क ७० रुपयांच्या आत देण्याची कृपा करावी.

यावर वरठी पोलीस स्टेशन चे ठाणेदार अभिजित पाटील यांनी येत्या ५ वर्षांच्या कालावधीमध्ये फक्त एक दुचाकी वाहन पकडले असल्याची खोटी माहिती दिली.

त्यावर माहिती अधिकार कार्यकर्ते अमर भालचंद्र वासनिक यांनी दिनांक १३-०८-२०२३ रोजी भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयात प्रथम अपील केले प्रस्तुत प्रथम अपील नियमाप्रमाणे भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे कार्यालयात फॉरवर्ड करण्यात आले. प्रस्तुत प्रथम अपिलामध्ये माहिती अधिकार कार्यकर्ते अमर वासनिक यांनी लिहिले की
दिनांक १४-०६-२०२३ रोजी अमर वासनिक यांनी आरटीआय अर्ज केला होता. आज दिनांक १३-०८-२०२३ रोजी अमर वासनिक हे प्रथम अपील करीत आहेत. प्रथम अपील करण्याची कारणे खालीलप्रमाणे आहेत.

संदर्भ:- दिनांक १२-०८-२०२३ रोजी च्या भंडारा उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय यांच्या ईमेल नुसार

१. सन २०१९ ते सन २०२३ च्या कालावधीत पाच वर्षे झालेली आहे. वरठी पोलीस स्टेशन च्या आवारात नेहमीच नव नवीन वाहने जप्त करून ठेवली असतात.
२. अमर वासनिक यांचे नेहमीच वरठी पोलीस स्टेशन येथे जाणे येणे असते. त्यांना नेहमीच रेती ट्रॅक्टर, ट्रक, कार, इतर वाहने, दुचाकी वाहने जप्त करून ठेवली दिसतात. याबाबत विचारणा केली असता वरठी पोलीस माहिती देण्यास टाळाटाळ करतात.
३. येत्या पाच वर्षांच्या कालावधित सुमारे १,१०० वाहने वरठी पोलिसांनी जप्त केले असून ती वाहने विकून वरठी पोलिसांनी आपले घर भरले आहेत.
४. अमर वासनिक यांना माहिती प्राप्त झाली नसून माहिती नीरांक दाखवण्यात आली आहे.
५. त्यामुळे सहाय्यक जनमाहिती अधिकारी यांनी संबंधित पोलिसांच्या भ्रष्टाचार प्रकरणावर पांघरून घातल्या प्रकरणी त्यांच्या पगारातून दंडाची कपात करण्यात यावी.
६. दिलेल्या पाच वर्षाच्या कालावधीतील वरठी पोलीस स्टेशन च्या आवारातील तसेच पोलीस स्टेशन वरठी येथील सीसीटिव्ही फुटेज तपासण्यात यावे.
७. वरठी पोलीस स्टेशन च्या आवारात येत्या पाच वर्षाच्या कालावधीत जप्त केलेली अनेक विविध वाहने असल्याचे साक्षीदार हे अपिलार्थी अमर वासनिक आहेत.

यावर दिनांक २३-१०-२०२३ रोजी प्रथम अपिलाच्या सुनावणीमध्ये अप्पर पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे यांनी आदेश दिला की अपिलार्थीस वरठी पोलीस स्टेशन च्या संबंधित नोंदवही तसेच संबधित दस्तऐवजाचे निरीक्षण करू देण्यात यावे असा लिखित आदेश काढला. प्रस्तुत जजमेंट दिनांक ०३-११-२०२३ रोजी वरठी पोलीस स्टेशन चे ठाणेदार यांना तसेच अपिलार्थिस लिखित स्वरूपात मिळाला.

           प्रस्तुत जजमेंट च्या विरोधात वरठी पोलीस स्टेशन चे ठाणेदार अभिजित पाटील यांनी सुडबुद्धीने वरठी पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या क्रिमिनल लोकांच्या हातून सामाजिक कार्यकर्ते अमर वासनिक यांना मानसिक त्रास देने चालू केले. दिनांक १४-११-२०२३ रोजी अभिजित पाटील यांनी अमर वासनिक यांच्या खाजगी मालमत्तेची नुकसानी करण्यासाठी गांजा तस्करांना पाचारण केले. स्वतःच्या खाजगी मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी सामोरे आलेले अमर वासनिक तसेच अमर वासनिक यांचे वडील भालचंद्र वासनिक यांच्यावर खोटे नाटे गुन्हे दाखल केले.
           अमर वासनिक त्या दिवशी पोलीस स्टेशन वरठी येथे जखमी अवस्थेमध्ये असताना अमर वासनिक यांच्यावर विविध गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या अभिजित पाटील यांनी दिल्या, माहितीचा अधिकार लावून शासकीय कामांमध्ये अडथळा आणत असल्याचे आरोप वरठी पोलीस स्टेशन चे ठाणेदार अभिजित पाटील यांनी अमर वासनिक यांच्यावर केले. तसेच अमर वासनिक यांना मानसिक दृष्ट्या प्रताडित सुद्धा करण्यात आले. आता खोट्या गुन्ह्यांची सोंगे सांगून अमर वासनिक यांना ठाणेदार अभिजित पाटील तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ अशोक बागुल यांनी माहितीच्या अधिकारापासून वंचित करून ठेवले आहे.
         अमर वासनिक यांनी जनहितार्थ भ्रष्टाचार विरोधी माहिती अधिकार लावला असता त्यांना माहितीच्या अधिकारापासून अश्या प्रकारे वंचित ठेवण्याचे कार्य ठाणेदार अभिजित पाटील तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ अशोक बागुल यांनी केले आहे. अशाप्रकारे माझ्या मौलिक अधिकारांचे हनन केल्याचा आरोप लोकशक्ती भ्रष्टाचार विरोधी सामाजिक संघटनेचे प्रदेश महासचिव अमर वासनिक यांनी पोलीस योद्धा न्युज नेटवर्क शी बोलताना केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *