हेडलाइन

जनसुरक्षा आणि सामाजिक, जनहितार्थ कार्यासाठी पोलीस निरीक्षक मनोज काळबांधे यांच्या नेतृत्वात रस्त्यांची डागडुगी.

Summary

जनसुरक्षा आणि सामाजिक, जनहितार्थ कार्यासाठी पोलीस निरीक्षक मनोज काळबांधे यांच्या नेतृत्वात रस्त्यांची डागडुगी. 12 किमी रस्त्यावरील आरमोरी पोलीसांनी बुजविले खड्डे. आमदार, खासदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला लाजवेल असे आरमोरी पोलीसांनी केले जनसुरक्षेचे कार्य.   गडचिरोली / चक्रधर मेश्राम दि. 25 […]

जनसुरक्षा आणि सामाजिक, जनहितार्थ कार्यासाठी पोलीस निरीक्षक मनोज काळबांधे यांच्या नेतृत्वात रस्त्यांची डागडुगी.

12 किमी रस्त्यावरील आरमोरी पोलीसांनी बुजविले खड्डे.

आमदार, खासदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला लाजवेल असे आरमोरी पोलीसांनी केले जनसुरक्षेचे कार्य.

 

गडचिरोली / चक्रधर मेश्राम दि. 25 जुलै 2022:-

रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ते, हे समजण्या पलीकडे रस्त्यांची बेकार अवस्था असतांनाही आभाळच फाटले तर ठिगळ कुठे.. कुठे लावणार अशी अडेलतट्टू पणाची मुजोर भूमिका बजावणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बेशरम अधिकाऱ्यांना लाजवेल, थोडीशी तरी शरम वाटावी असे महत्वपूर्ण जनसुरक्षा , देशातील मानवी सुरक्षा करण्याचे कार्य गडचिरोली पोलीस प्रशासनाचे जिल्हा पोलीस अधिक्षक अंकीत गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा यांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनाखाली आरमोरी पोलीस स्टेशनचे कार्यकुशल तत्पर, सामाजिक बांधिलकी जोपासणारे पोलीस निरीक्षक मनोज काळबांधे यांनी आपल्या 40 पोलीस कर्मचारी आणि होमगार्डच्या सहकार्याने ठाणेगांव ते वसा या तब्बल 12 कि. मी च्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे उत्कृष्ट काम केले आहे.

नागपूर ते गडचिरोली या राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी खूप खड्डे पडल्याने अनेकदा झालेल्या अपघातात काहीजण जखमी तर काहींनी आपले प्राणही गमावले. या प्राणघातक परिणामांचा गंभीरपणे विचार करून आरमोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज काळबांधे यांच्या खंबीर आणि निर्भीड नेतृत्वाखाली पोलीसांनी आपले श्रमदान जनहितासाठी अपिऀत केले. या महामार्गावर पडलेले लहान – मोठे खड्डे मुरूम चूरी गिट्टिने बुजवून निटनिटके केले. ही मोहीम सकाळी ११ वाजेपासून ५ वाजेपर्यंत तब्बल सहा तास राबविण्यात आली.

राष्ट्रीय महामार्ग कार्यालय आणि सार्वजनिक बांधकाम विभाग कुंभकर्ण झोपेत असल्याने या महामार्गावर रस्त्यांची दुरावस्था झाली होती. त्यात झालेल्या अपघातात अनेकजण मृत्यू पावले. या महामार्गावरून जिल्हा प्रशासनाचे अनेक अधिकारी, आमदार खासदार, लोकप्रतिनिधी ये.. जा करून आपले कामकाज करीत होते. मात्र सर्वांना लाजविण्याचे आणि शरम वाटावी असे जनहिताच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे काम आरमोरी पोलीस पोलीसांनी करून दाखविले आहे.

खड्डे बुजविण्याच्या उत्कृष्ट श्रमदान मोहीमेत पोलीस निरीक्षक मनोज काळबांधे, सहायक फौजदार रवींद्र चौके, देवराव कोडापे, एकनाथ घोडाम , रामेश्वर चवारे, लक्ष्मण नैताम, प्रशांत वऱ्हाडे, केशव केंद्रे, जौजाळकर, नरेश वासेकर, अकबरशहा पोयाम, रविंद्र लिंगायत, रजनीश पिल्लेवान, उमेश टाटपलान, पतीराम मडावी, प्रविण धंदरे, अतूल सेलोटे, अभय रंगारी, ज्ञानेश्वर सिडाम, वेणू हलामी, सरस्वती दरोऀ, होमगार्ड मोरेश्वर मेश्राम, अतुल भोयर, राजू रामटेके, प्रेमदास मातेरे, कमलाकर ढोरे, मधुकर ढोणे, सुरेंद्र शेंडे, विश्वनाथ चुधरी, लीलाधर मने, हेमराज देशमुख, तुषार तितीरमारे, तुळशीदास रामटेके, टिकाराम मुरांडे, पोलीस वाहनचालक नरेंद्र बांबोळे, देवराव केळझरकर यांच्यासह अनेक पोलीस कर्मचाऱ्यांचा जनहितार्थ महत्त्वाचा सहभाग होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *