!! जगभरातील भीम सैनीकांच्या कार्याला यश !!

या वर्षी चि जगभरातील भीम जयंती बघता मन भरून आल,
आमच्या समाजाचे वर्ष्या नु वर्षा चे मागील दिवस आठवले आणि आज आम्ही काय आहोत, यावर
आम्ही आज फ़क्त माज करतो,आत्म चिंतन करुन समाजा सोबत नम्रतेचा व्यवहार करत नाही, घडवले आम्हाला बाबासाहेबांच्या पराक्रमाने, आणि घमंड करतो आम्ही, मी मोठा, मी सुशिक्षित, म्हणून आपल्याच लोकांची अवहेलना करतो बाबासाहेबांन्नी केव्हाही संपणार नाही तेवढे आम्हालाच नाही तर प्रत्तेक नागरिकला त्यांनी दिल आहे, मात्रा बाबासाहेबांना बेईमान झालेल्याची संख्या कमी नाहीं, बाबासाहेबांची जन्म भूमि जरी महू असेल व त्यांची जयंती जर देश्याच्या च नव्हे तर जगाच्या काना कोपाऱ्यात होत असेल तर माझ्या मते बाबासाहेबांची जन्म भूमि हि पूर्ण विश्वच आहे,तसेच
तथागत भगवान गौतम बुद्धाची जन्म भूमि जरी कपिलवस्तु नगरी असेल आणि आज त्यांच्या अनेक मूर्तिया, शिल्प, राजमुद्रा, लेख जर देश्यातील कानाकोपऱ्यातिल जमीनीतून जर बाहेर निघत असणार तर मग भगवान गौतम बुद्धाची सुद्धा जन्म भूमि, ती ती जागा, ते ते राज्य आहे जेथे जेथे बुद्धाँचे अवशेष निघत आहेत,
बाबासाहेबांचे स्वप्नपूर्णकरण्याच्या हेतूने आज देश्यात विदेश्यात जी यन्त्रना, संघटना, चे जे अनेक भीमसैनिक आहेत त्यांचे फार मौलाचे ,योगदान,सहकार्य आहे की त्यांनी बाबासाहेबांचे विचार अनेक लोकांपर्यंत पोहोचविण्याचे मौलाचे कार्य केले आहे,
आज बाबासाहेबांची जयंती तेली, माळी ओबीसी, मुस्लिम, आणि सर्व समाज मिळून साजरी करीत
आहेत,अन्य समाजाला बाबासाहेब पटउन देने साधे काम नाही, पण आमचे भीम सैनिक हे साध्य करुन दाखवत आहेत, ज्या मुळे बावासाहेबांच्या प्रति समाज जागरूक होत आहे,
आणि आज देश विदेश बाबासाहेबांची जयंती अतिउत्साहाने साजरी करीत आहोत
लेख :-डॉ पुरुषोत्तम पंडागड़े
बल्लारपुर