जखमी अवस्थेत वानराला जीवनदान
वरठी : पाचगाव रोडवरील नहराच्या कॅनल जवळ वानर अत्यंत जखमी अवस्थेत दिसुन आले.सदर वानर ची अवस्था बघून मनोज शेंडे व अमित कनपटे यांनी सुनिल भोयर यांना तत्काळ माहिती कळविले,लगेच रवी प्रतीक व सुनिल भोयर यांनी वनविभागाला या घटनेची माहिती दिली,वनपरिक्षेत्र अधिकारी व संपूर्ण टिम घटनास्थळी दाखल झाली, आणि वानराला रेस्क्यू करून जीव वाचवण्यात यश मिळाले.
सर्वांनी वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे आभार व्यक्त केले,तसेच घटनास्थळी उपस्थित मनोज शेंडे,अमित कनपटे,अमिष डाकरे,अतुल डाकरे,राकेश शेंडे, सुनिल भोयर,अनिल आमटे,राहुल रहांगडाले,अमोल भुजाडे,गणेश कापसे,सुशील खुळे,होते.

