हेडलाइन

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबना प्रकरणानंतर कन्हान राष्ट्रवादी आक्रमक

Summary

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबना प्रकरणानंतर कन्हान राष्ट्रवादी आक्रमक   कन्हान : – कर्नाटक राज्यातील बंगळुर येथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारकच्या पुतळ्याची विटंबना कर णा-या समाज कंटकावर कार्यवाही न करता कर्नाटक चे मुख्यमंत्र्यानी छोटी गोष्ट असल्याचे वक्तव्य करणे या प्रकारामुळे […]

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबना प्रकरणानंतर कन्हान राष्ट्रवादी आक्रमक

 

कन्हान : – कर्नाटक राज्यातील बंगळुर येथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारकच्या पुतळ्याची विटंबना कर णा-या समाज कंटकावर कार्यवाही न करता कर्नाटक चे मुख्यमंत्र्यानी छोटी गोष्ट असल्याचे वक्तव्य करणे या प्रकारामुळे राष्ट्रवादी चांगलीच आक्रमक होत. या घटनेचा जाहीर निषेध केला.

कर्नाटकातील बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचा संतापज नक प्रकार समोर आलाय. धक्कादायक बाब म्हणजे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी विटंबना ही छोटी गोष्ट असल्याचं वक्तव्य केलं आहे. या प्रकारा मुळे राज्यात राष्ट्रवादी चांगलीच आक्रमक झाली आहे. कन्हान शहरात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे नाग पुर जिल्हाध्यक्ष शिवराय (बाबा) गुजर यांच्या नेतृत्वात शिवाजी नगर कन्हान येथील छत्रपती शिवाजी महारा जांच्या पुतळ्यास दुधाने अभिषेक करून महाराजांना पुष्पहार अर्पण करित जय घोष करून कर्नाटक राज्य सरकार व मुख्यमंत्री यांचा निषेध करित राष्ट्रवादी पदा धिकारी व कार्यकर्त्यानी जोरदार घोषणाबाजी करित घटनेचा निषेध व्यक्त केला. याप्रसंगी राष्ट्रवादी कॉग्रेस नागपुर जिल्हाध्यक्ष मा. शिवराज(बाबा) गुजर, जिल्हा महासचिव गणेश पानतावणे, जिल्हा सचिव दलजित पात्रे, रामटेक विधानसभा कार्याध्यक्ष अशोक पाटील , पारशिवनी तालुकाध्यक्ष पुरणदास तांडेकर, रामटेक विधानसभा युवक अध्यक्ष देवीदास तड़स, नागपुर जिला मिडिया सेल महासचिव रोहित मानवटकर, कन्हान शहराध्यक्ष अभिषेक बेलसरे, रामटेक विधान सभा सचिव संगीत भारती, तालुका मिडीया सेल अध्य क्ष शफीक शेख, आंनद बेलसरे, नरेश सोनेकर, लोकेश डहाके सह महिला, पुरूष पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

संजय निंबाळकर

राज्य चिफ ब्युरो

9579998535

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *