छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी — सामाजिक न्याय दिन महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात उत्साहात साजरा

चामोर्शी तालुक्यातील –
आष्टी – महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, आष्टी येथे 26 जून 2025 रोजी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. या विशेष दिनाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय फुलझेले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. रवी गजभिये यांच्या नेतृत्वात उपक्रम राबविण्यात आले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, तसेच एनएसएसचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाहू महाराजांच्या सामाजिक न्यायाच्या विचारांची आठवण करून देत, विद्यार्थ्यांना समतेचे, बंधुतेचे व लोकशाही मूल्यांचे महत्त्व पटवून देण्यात आले.
छत्रपती शाहू महाराज यांनी दिलेल्या शिक्षण, आरक्षण आणि सामाजिक सुधारणा यासारख्या क्रांतिकारी निर्णयांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक समतेचा संदेश रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व विभागांचे आणि स्वयंसेवकांचे मोलाचे योगदान लाभले. सामाजिक न्याय दिनानिमित्त महाविद्यालयात प्रेरणादायी वातावरण अनुभवास मिळाले.
पोलीस योद्धा नेटवर्क न्यूज
गडचिरोली चामोर्शी तालुका
प्रतिनिधि
गजानन पुराम
मो. 7057785181