चोरीला गेलेला ट्रक स्पेअर पार्ट सह जप्त चोरीत वापरलेले टोईंग वाहन ही जप्त मुख्य सुत्रधार फरार पोलीस आपीतांचे मागावर
वार्ताहर -कोंढाळी
नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील कोंढाळी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चाकडोह येथून चोरीला गेलेला आयशर ट्रक चे वेगवेगळ्या भागात करत असतानाच कोंढाळी पोलिसांनी चोरीला गेलेला ट्रक व त्या ट्रकचे स्पेअर पार्ट सहित ट्रकला तो करून नेणारे टोइंग वाहन सह तीन आरोपींना कोंढाळी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे यातील मुख्य आरोपी ट्रकचालक सह चेचीस विकत घेणारे व दोन व चोरीचा ट्रक विल्हेवाट लावणारे तीन चार आरोपी अजूनही फरार असल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार
पोलीस स्टेशन कोंढाळी येथे येथे तक्रारदार नामे सतिश कैलास भोपे वय २८ वर्ष व्य. ट्रकमालक रा. बिलखेडा ता. धरणगाव जि. जळगाव यांनी दिनांक २३/०८/२०२४ रोजी तक्रार दिली की त्यांची आयशर गाडी क्रमांक एम एच १८ बि जी ९६२१ हीचेवर एक महीन्यापासुन जुनेद आबीद शेख वय २४ वर्षे रा. नगरदेवळा ता. चाळीसगाव जि. जळगाव याला चालक म्हणुन कामावर ठेवले होते ,दिनांक ३०/०७/२०२४ रोजी हरीओम लॉजेस्टिक वाडी यांचे ऑर्डर मिळाल्याने माझे सांगणेवरुन चालक जुनेद याने हरीओम लॉजिस्टीक वाडी येथुन परच्यून माल आयशर मध्ये लोड करुन रात्री ०८:०० वा. चे सुमारास जळगाव येथे जाणेकरीता नागपुर अमरावती मार्गाने निघाला असता चालक याने मालकाला फोन करुन सांगीतले की गाडीची अचानक वायरींग जळाल्याने गाडी कोंढाळी जवळील चाकडोह गावाजवळ ना दुरुस्त झालेली आहे. दिनांक ०८/०८/२०२४ रोजी पासुन सदर चालकाचा संपर्क न झाल्याने सदर वाहन मालकाने सदर ठिकाणी येउन वाहन व वाहन चालकाचा शोध घेतला असता मिळुन आले नाही त्यावरुन तक्रारदार यांची खात्री पटली की त्यांची आयशर गाडी क्रमांक एम एच १८ बि जी ९६२१ ही सदर गाडीवरील चालक जुनेद आबीद शेख याने त्यांचा विश्वासघात करुन कोठेतरी घेउन गेला आहे व गहाळ केली आहे. या तक्रारीवरुन ठाणेदार राजकुमार त्रिपाठी यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक २३/०८/२०२४ रोजी अपराध क्रमांक ६२१/२०२ कलम ३१६ (२), ३१६ (४) भारतीय न्याय संहीता अन्वये गुन्हा दाखल करुन तपासात घेतला आहे.
पोलीस स्टेशन कोंढाळी हे नागपुर ते अमरावती राष्ट्रीय महामार्ग ५३ वरील अतीसंवेदनशील
पोलीस स्टेशन असुन, महामार्गावरील सदर घटनेच्या तपास अनुषंगाने तात्काळ विशेष पथक स्थापन करण्यात आले. त्यानुसार पथकामार्फत पोस्टे कोंढाळी हददीतील अशा प्रकारचे गुन्हे करणारे संशयीत गुन्हेगारांच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले होते तसेच याबाबत गोपणीय बातमीदार नेमण्यात आले व सिसी टी व्ही फुटेज चेक करण्यात आले. दि. २६/०८/२०२४ रोजी मिळालेल्या गोपणीय माहीतीनुसार, पथकामार्फत तपासादरम्यान आरोपी नामे १) खालीद हारुण राठोड वय २८ वर्षे रा. गुलमोहर नगर, भरतवाडा रोड, नागपुर २) मोहम्मद नसीर अब्दुल अजीज वय ३९ वर्षे रा. कडबी चौक, ऑरेंज नगर, नागपुर ३) अताउल रहमान अजीज उल रहमान वय ४२ वर्ष रा. हंसापुरी खदान, नागपुर यांना दि. २७/०८/२०२४ रोजी अटक करण्यात आली आहे. त्यांचेकडुन आयशर गाडी क्रमांक एम एच १८ बि जी ९६२१ वाहनाचे वेगवेगळे केलेले भाग १) आयशर वाहनाचे कॅबीन २) आयशर वाहनाचे बॉडी २) आयशर वाहनाचे डी इ एफ २७ लिटर क्षमतेची टॅक ३) टोव्हींग व्हॅन क्रमांक एम एच २७ डी एल ५४१८ ४) आयशर वाहनाचे चेसीस (टायर, इंजीन व इतर साहीत्य समाविष्ट असलेले) हस्थगत करण्यात आले आहे. सदर गुन्हयाचा तपास सुरु असुन उर्वरीत आरोपी अटक करणे बाकी आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक हर्ष पोदार , अपर पोलीस अधिक्षक रमेश धुमाळ , उपविभागीय पोलीस अधिकारी, काटोल बापु रोहोम यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन कोंढाळी चे ठाणेदार राजकुमार रा. त्रिपाठी यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक धवल देशमुख, पो.हे.कॉ अब्दुल राजीक, नितेश राठोड, पो.ना मनोज आगरकर, अमित पवार, चालक पो.हे.कॉ पंकज चिव्हाणे यांनी केली आहे.