चिमूर तालुक्यातील धक्कादायक घटना. शरीराचे केले अनेक तुकडे परिसरात भीतीचे वातावरण…
Summary
चिमूर तालुक्यातील धक्कादायक घटना. शरीराचे केले अनेक तुकडे परिसरात भीतीचे वातावरण संदीप तुरक्याल चंद्रपूर जिल्हा न्युज रिपोर्टर महाराष्ट्र राज्य…. चिमूर… तालुक्यात असलेल्या शेतातील प-हाटीत असलेले गवत कापण्यासाठी गेलेल्या शेतक-याला दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने हल्ला करून ठार केल्यानंतर […]
चिमूर तालुक्यातील धक्कादायक घटना. शरीराचे केले अनेक तुकडे परिसरात भीतीचे वातावरण
संदीप तुरक्याल
चंद्रपूर जिल्हा न्युज रिपोर्टर महाराष्ट्र राज्य….
चिमूर… तालुक्यात असलेल्या शेतातील प-हाटीत असलेले गवत कापण्यासाठी गेलेल्या शेतक-याला दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने हल्ला करून ठार केल्यानंतर त्याचे डोके, हात, पाय धडापासून वेगळे करीत शरीराच्या पोटाचा भाग खाऊन टाकला असल्याची धक्कादायक घटना समोर आली असून देविदास महादेव गायकवाड (वय ४०) रा. सोनेगाव बेगडे (चिमूर) असे मृत शेतक-याचे नाव आहे. त्याच्या धडापासून वेगळे झालेले अवयव वनविभागाने वेगवेगळ्या शेतातून ताब्यात घेतले आहे. घटनेची भिषणता लक्षात घेता चिमूर, सोनेगाव परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार चिमूर शहरापासून अवघ्या तीन किमी अंतरावर सोनेगाव बेगडे हे छोटेसे गाव आहे. देविदास महादेव गायकवाड (वय ४०) हा शेतकरी तेथील रहिवासी होता. सदर शेतक-याची शेती चिमूरला वरोरा मार्गावर पाॅवर प्लांट जवळ लागून आहे. त्याने शेतात यावर्षी प-हाटीची लागवड केली आहे. सहा ते सात फूट उंच असलेल्या पिकाची देखरेख तो दररोज शेतात जावून करीत होता. शिवाय प-हाटीत वाढलेले तन (गवत) काढत होता. काल गुरूवारी (16 डिसेंबर)ला सकाळी दहाच्या सुमारास तो शेतात पथकातील गवत काढण्यासाठी गेला होता.
शेतातील पिक उंच असल्याने पिकात दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाचा त्याला जराही मागोसा आला नाही. त्यामुळे वाघाने त्याला प-हाटीतच ठार केले. त्यामुळे सदर शेतकरी हा सायंकाळी घरी परत आला नाही. रात्र होवूनही घरी न परतल्याने म्हातारी आई आणि भाऊ यांनी, आपल्या काही नातेवाईकांसोबत शेतात जावून शोधण्याचा प्रयत्न केला पण रात्रीची वेळ असल्याने त्याचा शोध लागला नाही.