BREAKING NEWS:
गडचिरोली महाराष्ट्र हेडलाइन

चिचडोह बॅरेज प्रकल्पाचे पावसाळयापुर्वी सर्व दरवाजे उघडण्याबाबत नदीकाठी गावांना/ लोकांना सुचना

Summary

गडचिरोली,(जिमाका)दि.24: वैनगंगा नदीवर गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुका मुख्यालयापासून उत्तरेस 5.00 किमी अंतरावर चिचडोह बॅरेजचे बांधकाम जून 2018 मध्ये पूर्ण झालेले आहे. सदर बॅरेज मार्कंडा देवस्थानापासून वैनगंगा नदीचे वरचे बाजुस 4.00 किमी वर आहे. सदर बॅरेजची एकुण लांबी 691 मी. असून […]

गडचिरोली,(जिमाका)दि.24: वैनगंगा नदीवर गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुका मुख्यालयापासून उत्तरेस 5.00 किमी अंतरावर चिचडोह बॅरेजचे बांधकाम जून 2018 मध्ये पूर्ण झालेले आहे. सदर बॅरेज मार्कंडा देवस्थानापासून वैनगंगा नदीचे वरचे बाजुस 4.00 किमी वर आहे. सदर बॅरेजची एकुण लांबी 691 मी. असून 15.00 मीटर लांब X 9.00 मी. उंचीचे 38 लोखंडी उभे उचल दरवाजे बसविण्यात आलेले आहेत. दि. 15 ऑक्टोंबर 2022 पासून सर्व दरवाजे बंद करण्यात आले होते.
यावर्षी हवामान खात्याच्या अंदाजानुसार पावसाळा 1 जून पासुन सुरु होत आहे. बॅरेजमध्ये साठविलेला पाणीसाठा कमी करुन सर्व 38 दरवाजे 01 जून 2023 ला उघडण्याचे नियोजित आहे. त्यामुळे नदीतील निम्न भागातील पाण्याची पातळी वाढणार आहे. वाढीव पाणी पातळीमुळे जिवित व वित्त हानी होवू नये म्हणून नदी लगतचे सर्व गावांना/ग्रामपंचायतींना सुचना देण्यात येते की, सदर कालावधीत नदी
काठावर जाणे टाळावे तसेच नदीकाठावरील शेतांमध्ये कामे करतांना सतर्क राहावे. मार्कंडा देवस्थान येथील यात्रेकरु नदीवर आंघोळ करतांना, मासेमारी करणारे, नदीघाटातून रेती काढणारे, पशुपालक, नदीतून ये-जा करणारे अशा जनतेने खबरदारी घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे. असे उपकार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे विभाग, चंद्रपूर यांनी कळविले आहे.
टिप : सोबत गावांची यादी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *