चिकना वाशियांचा शिक्षकासाठी आंदोलनाचा एल्गार वर्ग चार शिक्षक एक शिक्षकासाठी गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन
बारव्हा :- लाखांदूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या चिकना येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सद्या एकच शिक्षक कार्यरत असून वर्ग चार व शिक्षक एक अशी परिस्थिती निर्माण झाल्याने विध्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. संबंधित शाळेला आणखी एक शिक्षक देण्यात यावे. अन्यथा १२ फरवरी पासून ग्रामस्थ पंचायत समिती लाखांदूर समोर बेमुदत आमरण उपोषण करणार! अशा इशारा ग्रामस्थांनी लाखांदूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांना निवेदनातून दि.५ फरवरी रोजी दिला आहे.
प्राप्त निवेदनानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिकना येथील शाळेत वर्ग एक ते चार असून विद्यार्थी संख्या १८ आहे. येथे दोन शिक्षक कार्यरत होते. मात्र काही महिन्यापूर्वी सहाय्यक शिक्षिका मडावी यांची बदली लाखांदूर तालुक्यातील पिंपळगाव /कोह. येथे करण्यात आली.मात्र शिक्षक व विद्यार्थ्यांची संख्या बघता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे. येथे दुसऱ्या एका शिक्षकाची नियुक्ती करण्यात यावी. व विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान थांबवावे. यासाठी ग्रामस्थांनी व शालेय शिक्षण समितीने वारंवार निवेदनातुन मागणी केली. मात्र संबंधित विभागाकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही.चिकना येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला सहाय्यक शिक्षक देण्यात यावे.अन्यथा पंचायत समिती लाखांदूर कार्यालया समोर आमरण उपोषण करणार असल्याचे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. निवेदन देतेवेळी सौ. भाग्यश्री सामृतवार शिक्षण समिती अध्यक्ष, रंजीत सोनपिंपळे उपाध्यक्ष सौ. जयश्री गणेश सोनपिंपळे सदस्य, सौ.मनिषा अंगेश दहिवले सदस्य,कु. मयुरी जयभीम कोचे सदस्य ,सौ. कांचन मोहन बोरकर सदस्य, धनराज कांबळे सदस्य, सौ. रानी उद्धव कांबळे, सौ. उषा जागेश्वर वलथरे सदस्य, सौ.वैशाली गणेश भोपे सदस्य,तुलाराम गणविर सदस्य, तथा ग्रामपंचायत येथील उपसरपंच प्रकाश शेंडे प्रशांत दहिवले ग्रां. पं. सदस्य, सौ.उषा मधुकर टांगसेलवार सदस्य, सौ.लता रोशन सुरपाल सदस्य, सौ.सुजाता आनंदराव रंगारी सदस्य, सौ. उर्मीला यशवंत टांगसेलवार पोलीस पाटील ,अंगेश महेंद्र दहिवले तंटामुक्त समती अध्यक्ष,गणेश सोनपिपंळे सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.