चिकना गावात बिबट्याची दहशत
Summary
लाखांदूर (प्रतिनिधी गणेश सोनपिंपळे) – लाखांदूर तालुक्यातील चिकना गावात बिबट्याच्या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या सुमारास बिबट्या शिकारीच्या शोधात थेट गावात प्रवेश करत योगेश सुरपाल यांच्या शेतात आल्याची घटना घडली. सुदैवाने या वेळी कोणतीही शिकार झाली नाही. […]
लाखांदूर (प्रतिनिधी गणेश सोनपिंपळे) –
लाखांदूर तालुक्यातील चिकना गावात बिबट्याच्या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या सुमारास बिबट्या शिकारीच्या शोधात थेट गावात प्रवेश करत योगेश सुरपाल यांच्या शेतात आल्याची घटना घडली.
सुदैवाने या वेळी कोणतीही शिकार झाली नाही. मात्र, शेतात बिबट्याच्या हालचालींचा व्हिडिओ स्थानिकांनी मोबाईलमध्ये कैद केला असून तो सध्या सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.
ग्रामस्थांनी वन विभागाला तात्काळ माहिती दिली असून परिसरात पिंजरा लावण्याची मागणी केली आहे. बिबट्याचा पुन्हा वावर होऊ नये म्हणून गावात सतर्कता वाढवण्यात आली आहे.
—
