चारित्र्य संपन्नता- कठोर परिश्रम-सतत ज्ञानार्जनाचे उद्धिठ सामोर ठेवा. राजकुमार त्रिपाठी
Summary
कोंढाळी- वार्ताहर शिक्षण ही आपल्या जीवनातील सर्वात महत्वाची पायरी आहे. हे आपल्या जीवनाला ज्ञान, आत्मविश्वास, शहाणपणा, मूल्ये देऊन परिवर्तन करते आणि आपल्याला समाजाच्या उत्कर्षासाठी योगदान देण्याच्या क्षमतेसह सुसज्ज करते. निःसंशयपणे, शालेय शिक्षण हा महत्वाचा भाग आहे आणि आपल्या पायाची प्राथमिक […]
कोंढाळी- वार्ताहर
शिक्षण ही आपल्या जीवनातील सर्वात महत्वाची पायरी आहे. हे आपल्या जीवनाला ज्ञान, आत्मविश्वास, शहाणपणा, मूल्ये देऊन परिवर्तन करते आणि आपल्याला समाजाच्या उत्कर्षासाठी योगदान देण्याच्या क्षमतेसह सुसज्ज करते. निःसंशयपणे, शालेय शिक्षण हा महत्वाचा भाग आहे आणि आपल्या पायाची प्राथमिक आवश्यकता आहे परंतु आयुष्यात टिकून राहण्यासाठी आणि वाढवण्यासाठी महाविद्यालयीन शिक्षण खूप महत्वाचे आहे. या करिता चारित्र्य संपन्नता- आपल्या अंगी बाळगा तसेच मोबाईल चा वापर जपून करा,आपण देशाचे भविष्य आहात.
आसे मत कोंढाळी पोलीस स्टेशन चे ठाणेदार राजकुमार त्रिपाठी यांनी राजेंद्र सिंह (बाबा)व्यास कला वाणिज्य महाविद्यालयाचे संस्थपक स्व गोविंद सिंह व्यास यांचे पुण्यतिथि निमित्य ०५ऑगष्ट रोजी महाविद्यालयाचे सभागृहात उपस्थित कोंढाळी परिसरातील हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे वर्ग १० आणि १२चे व आर बी व्यास महाविद्यालयीन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व पालक मेळाव्याचे आयोजन प्रसंगी उपस्थित विद्यार्थी, पालक व महाविद्यालयाचे शिक्षक शिक्षकेत्तर वर्गा समोर मार्गदर्शन करते प्रसंगी बोलत होते. महाविद्यालयाचे माजी प्राधयापक डॉ महेंद्र सिंह राठोड यांनी डाॅ ए पी जे अब्दुल कलाम यांचे सारखे
आयुष्यात ध्येय ठेवा, सतत ज्ञान मिळवा, कठोर परिश्रम करा आणि महान जीवनाची जाणीव करण्याचे धैर्य ठेवा असे विद्यार्थ्यांना सांगितले. संस्थेचे अध्यक्ष वीरेंद्र सिंह व्यास यांनी
महाविद्यालयीन शिक्षण आपल्याला ज्ञानाचे सामर्थ्य देते आणि जीवनातल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार करते. हे आम्हाला विशेष शैक्षणिक सक्षम करते आणि पदवी प्रदान करते, जे करिअर घडविण्यात मदत करते. हे जीवनात ज्ञान आणि संधीची विस्तृत क्षितिजे देखील उघडतेआसे मत मांडले.
आजच्या समाजात शिक्षणाचे महत्त्व खूप वाढले आहे. शिक्षणाचे उपयोग अनेक आहेत पण त्याला नवी दिशा देण्याची गरज आहे. शिक्षण असे असले पाहिजे की एखादी व्यक्ती त्याच्या पर्यावरणाशी परिचित होऊ शकते. त्याच प्रमाणे
प्रत्येकाने पुढे जाण्यासाठी आणि जीवनात यश मिळवण्यासाठी उत्तम शिक्षण अत्यंत आवश्यक आहे. आपल्यामध्ये आत्मविश्वास वाढवण्याबरोबरच हे आपले व्यक्तिमत्व घडवण्यासही मदत करते. आसे वक्तव्य माजी प्राचार्य नंदाताई तातोडे यांनी मांडले.तर शालेय शिक्षण प्रत्येकाच्या जीवनात मोठी भूमिका बजावते. प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण अशी संपूर्ण शिक्षण व्यवस्था तीन भागांमध्ये विभागली गेली आहे. शिक्षणाच्या सर्व स्तरांचे स्वतःचे विशेष महत्त्व आणि स्थान आहे. आपल्या सर्वांना आपल्या मुलांना यशाच्या दिशेने जाताना बघायचे आहे, जे चांगल्या आणि योग्य शिक्षणाद्वारेच शक्य आहे.
संपूर्ण शिक्षण प्रक्रियेदरम्यान मिळालेले ज्ञान आपल्या सर्वांना आणि प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनाकडे स्वावलंबी बनवते. असे मत सामाजिक कार्यकर्ता दुर्गाप्रसाद पांडे यांनी आपल्याला मार्गदर्शनात सांगितले .लाखोटीयांची भुतडा कनिष्ठ महाविद्यालयाचे उच्च माध्यमिक अंतिम परिक्षे पुर्वी घेण्यात आलेल्या शालेय परिक्षे प्रसंगी आर बी व्यास महाविद्यालय चे प्राध्यापक व निवडक विद्यार्थ्यांनी परिक्षा चे सहकार्य केल्यास बद्दल लाखोटीया भुतडा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य व परिक्षा प्रमुखांनी महाविद्यालयातील विद्यार्थी प्राध्यापक व संस्था अध्यक्षांचा सत्कार केला.
या प्रसंगी याकूब पठाण राजस्व मंडळ अधिकारी सुरज साददकर यांचे प्रमुख उपस्थितीत संस्थेच्या व्यवस्थापन समिती चे सदस्य दिलीप जाऊळकर, प्रमिला देवी चंदेल,स्वप्निल व्यास,अभिजीत चव्हाण, तसेच ज्येष्ठ समाजसेवक सेवक प्रभूदयाल शर्मा, याकूब (प्यारू) पठाण,ला भु कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सुधीर बुटे, ज्येष्ठ पर्यवेक्षक हरिष राठी, परिक्षा प्रमुख सुनिल सोलव,प्रमोद सावरकर,नारायण तातोडे, बाबूलाल राठोड,
यांचे उपस्थितीत महाविद्यालयाचे प्राचार्य डा राजू खरडे यांनी प्रास्ताविकेतून महाविद्यालयाचे प्रगती बाबद तसेच महाविद्यालयीन शैक्षणिक विषयी माहिती दिली
या प्रसंगी डाॅ एल आर, घागरे, डाॅ राजू अंबाडकर,डाॅ प्रज्ञासा उपाध्याय,डाॅ विजय भोसे, विजय सिंह परिहार सह महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक शिक्षकेत्तर स्टाफ उपस्थित होता, कार्यक्रमाचे संचलन डॉ . हरिदास लाडके /डॉ गोपीचंद कठाणे तर आभार डॉ एल आर घागरे यांनी केले।