चामुंडा एक्सप्लोसिव्ह कंपनीत झालेल्या स्फोटाच्या घटनेची सखोल चौकशी करा… यापुढे कोणताही स्फोट होणार नाही याची शासन /प्रशासन व कंपनी व्यवस्थापनाने काळजी घ्या …केंद्रीय मंत्री नितीन गडकरी स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना 35 लाख केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा उच्चस्तरीय चौकशीचे आदेश विरोधी पक्षनेते वडेट्टीवार व माजी गृहमंत्री अनिल देशमुख माजी मंत्री सुनिल केदार, खासदार बर्वे घटनास्थळी
कोंढाळी/ प्रतिनिधी
गुरुवारी, 13 जून रोजी दुपारी 1 ते 1:30 च्या दरम्यान, नागपूर अमरावती महामार्गावर नागपूरपासून 30 किमी अंतरावर असलेल्या धामणा गावाजवळील चामुंडा एक्सप्लोसिव्ह कंपनीत स्फोट झाला होता, त्यात पाच महिला आणि एक पुरुष असे सहा मजूर ठार झाले . पाच मजुरांचा नागपुरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या वर उपचार सुरू आहे. घटनेची माहिती मिळाल्यावर देशाचे केंद्रीय परिवहन मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी तसेच नागपूरचे पोलीस आयुक्त रविद्र सिंघल यांनी चामुंडा स्फोटक कंपनी नेरी मानकर (धामणा) घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. स्फोट कसा झाला याची माहिती कंपनी व्यवस्थापनाकडून विचारली असता, स्फोटाचे कारण अद्याप कळू शकले नाही, असे सांगून नितीन गडकरी व्यवस्थापनाच्या बेजबाबदार उत्तराने संतप्त झाले आणि त्यांनी उपस्थित नागपूर पोलीस आयुक्त रविंद्र सिंघल यांना या स्फोटाची चौकशी साठी या घटनेशी संबंधित सर्व वरिष्ठ अधिकार्याची ताबतोब बैठक घेऊन सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले असून, या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच भविष्यात असे अपघात होणार नाहीत याची गंभीर दक्षता घेण्याचे आदेश कंपनी प्रशासन व संबंधीत विभागाला दिले आहेत.
मृतकाचे कुटुंबांचा आक्रोश
चामुंडा एक्स्प्लोझिव्ह कंपनी धामणा येथे १३ जून रोजी झालेल्या भीषण स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या सहा मजुरांच्या कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला आणि या घटनेला जबाबदार असलेल्यांवर कारवाई आणि त्यांच्या निकटवर्तीयांना नुकसान भरपाई देण्याच्या मागणीवर ठाम राहिले. मृतांच्या नातेवाइकांचे सांत्वन करण्यासाठी आणि मृतांच्या नातेवाईकांच्या मागण्यांना न्याय देण्यासाठी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी मृताचे नातेवाईक व उपस्थित ग्रामस्थ व प्रशासकीय अधिकाऱ्यांना समक्ष सांगितले की, यात मृत्युमुखी पडलेल्या मजुराच्या नातेवाईकांना या घटनेची माहिती महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून सरकारने 10 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली तसेच कंपनी मालक व कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा करून 25 लाख रुपयांची मदत देण्याची मागणी केली. कंपनी व्यवस्थापनाने आधी मृत कुटूंबीयाना 25लाखाचा मोबदला देणयाचे असमर्थता दर्शवली पण नामदार नितीन गडकरी यांनी 25लाख देण्यासाठी चामुंडा चे मालकाशी चर्चा केली ,यावर चामुंडा कंपनी मालकाने नामदार गडकरी यांची मागणी मान्य केली . अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उपस्थित गावकरी,मृतांचे कुटूंबियां समक्ष दिली. व सांगितले की राज्य सरकार चे 10लाखा व कंपनी व्यवस्थापनाकडून 25 लाख कसे एकूण 35लाखा चे मोबदला मिळवून देण्याची जबाबदारी म्हणून घोषणा केली.ही मागणी कंपनी प्रशासकाने मान्य केल्याने या घटनेत मृत झालेल्या मृतांच्या कुटुंबीयांनी सहमती दर्शवली असून या घटनेतील गंभीर जखमींवर नागपूर येथे उपचार सुरू असून त्यांच्यावर वैद्यकीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) उपचार केले जातील. अशी जाहीर माहिती नितीन गडकरी यांनी या प्रसंगी धामना येथे दिली.
यावेळी हिंगणा विधानसभेचे आमदार समीर मेघे
माजी जिल्हापरिषद अध्यक्ष सुनीता गावंडे, जिल्हापरिषद सदस्य भारती पाटील, काटोल विधानसभेचे भाजप प्रभारी चरणसिंग ठाकूर, पं.स.चे उपसभापती अविनाश पारधी,
धामणा उप सरपंच मनोहर येळेकर यांच्यासह मृतांचे नातेवाईक उपस्थित होते.
विरोधी पक्षनेते. विजय वडेट्टीवार ही घटनास्थळी
घटनेचे गांभीर्य पाहून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, रामटेक लोकसभेचे खासदार श्याम कुमार बर्वे, काटोल विधानसभेचे आमदार तथा माजी गृहराज्यमंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री सुनील केदार, शिवसेना उबाठा चे राजेंद्र हरणे, बबलू बिसेन, राकेश असाटी,नितीन ठवळे, बंडू राठोड, थामस निंभोरकर यांनी मृत कुटूंबियांना भेटून योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन देत सांत्वन केले.
शिवसेना उबठाचे राजू हरणे उपस्थित होते.
चामुंडा दारू गोळा कंपनी मधे मृत सहा जणांपैकी पाच धामण येथील तर एक सतनवारी गावातील होता. विच्छेदनानंतर पाच ही मृतांचे पार्थिव धामणा गावात पोहोचताच गावातील सर्वांच्या डोळ्यांतून अश्रू अनावर झाले.
पोलीसांचा चोख बंदोबस्त
धामना गावात, महामार्गावर तसेच कंपनी परिसरात
यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी कंपनीच्या आवारात, महामार्गाच्या दोन्ही बाजूला व गावात पोलीस बंदोबस्त कडेकोट केला होता.
आधी धनादेश मागणी
मृत देह कंपनी गेट सामोर
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 35लाखाचे धनादेश मिळून देण्याचे आश्वासना दिली. या प्रसंगी मृतकाचे कुटूंबियांनी गडकरी यांचे म्हणणे मान्य केले होते. मात्र शव विच्छेदनना नंतर मृत देह धामना गावात पोहोचले तेंव्हा मृतकाचे कुटुंबीय व गावकऱ्यांनी आधी 25लाखाचा धनादेश नंतर चे शव दहन म्हणत मृत देह चामुंडा कंपनी गेट सामोर आणून ठेवले.
या दरम्यान जोरदार पाऊस आला . पावसातच मृत देह कंपनी गेट सामोर ठेवले होते .