BREAKING NEWS:
नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

चाचेर ग्रामपंचायतमध्ये मासिक पाळीबाबत जनजागृती

Summary

नागपूर,ता.१ : आजही शहरी-ग्रामीण भागात महिला आणि मुलींमध्ये मासिक पाळीबाबत जनजागृती झालेली नसून पारंपारिक दृष्ट्याच त्याकडे पाहिले जाते. या काळात स्वच्छता अतिशय महत्त्वाची असतानाही याबाबतच्या अज्ञानामुळे या महिलांच्या आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत. यामुळेच या भागातील महिलांमध्ये मासिक पाळीबाबत जनजागृती करण्यासाठी […]

नागपूर,ता.१ : आजही शहरी-ग्रामीण भागात महिला आणि मुलींमध्ये मासिक पाळीबाबत जनजागृती झालेली नसून पारंपारिक दृष्ट्याच त्याकडे पाहिले जाते. या काळात स्वच्छता अतिशय महत्त्वाची असतानाही याबाबतच्या अज्ञानामुळे या महिलांच्या आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत. यामुळेच या भागातील महिलांमध्ये मासिक पाळीबाबत जनजागृती करण्यासाठी ए.एस.के.के सेनिटरी पँड ग्रुप व पी.ए फाऊंडेशन यांच्या वतीने मासिक पाळीत सुरक्षा कशी ठेवावी याबरोबरच पॅडचा वापर कसा करायचा, याचे प्रशिक्षण मौदा तालुक्यातील चाचेर ग्रामपंचायत येथे करण्यात आले. कार्यक्रमाला चाचेर ग्रामपंचायतच्या सरपंच लुंबीनी कलारे, लिपिक चंद्रशेखर देवगडे, प्रीती बावनकुळे, आकाश राऊत, रामानंद खडसे,पुष्पा बिसेन,रंजना नगरे,वैशाली उपस्थित होत्या. कल्याणी जांभुळकर, जोगेश जांभुळकर, अक्षय अंबादे यांनी महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमाला चाचेर गावातील समस्त महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचालन लुंबीनी कलारे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *