चरणसिंग ठाकूर या भागाचा विकासासाठी समर्थ केंद्र व राज्य सरकार यांच्या मधे समन्वय राखण्यात यशस्वी
काटोल – प्रतिनिधी
दिनांक 1 स्पटेबर रोजी काटोल येथील कृषी उत्पन्न बाजार समिती काटोल येथे काटोल नरखेड विधानसभा प्रमूख चरणसिंग ठाकुर यांचा वाढदिवस व सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी पाशा पटेल यांनी आपल्या मार्गदर्शनात अजून काटोल भागाचा विकास करायचा असेल तर चरणसिंग ठाकुर यांची काम करण्याची जिद्द , चिकाटी, आपल्या भागाचा विकास कसा करायचा ह्याचा ध्यास मनासी बाळगून ते नेहमी कार्य करीत असतात. अशा कष्टाळू मानूस आमदार झाल्यास विकासाचा वेग अधिक वाढेल, ते आमदार नसतांना देखील इतका निधी आणतात तर आमदार झाल्यावर हजार कोटींचा निधी खेचून आणेल यात कोणतीही शंका नाही असे पाशा पटेल बोलत होते. यावेळी मंचावर शेतकरी नेते व माजी आमदार पाशा पटेल, भाजपा जिल्हाध्यक्ष सुधार कोहळे, माजी आमदार आशिष देशमुख,
डी मल्लिकार्जुन रेडी.
डॉ.राजीव पोतदार,अरविंद गजभिये, किशोर रेवतकर भाजी नगराध्यक्ष वैशालीताई ठाकूर, जिल्हा सरचिटणीस दिनेश ठाकरे, जिल्हा परिषद सदस्या
पुष्पा चाफले,मीनाक्षी सरोदे, पार्वती काळबांडे, अधिवक्ता दीपक काणे, महामंत्री उकेशसिंग चव्हाण, जीवन चरडे, संदीप सरोदे, सोपान हजारे यांची उपस्थिती होती. यावेळी चरणसिंग ठाकूर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करून दोनशे किलोंचा हार अर्पण करण्यात आला. पटेल म्हणाले, पृथ्वीवरील मानवजातीला वाचविणेआवश्यक आहे. जग प्रदूषणाच्या आगीत होरपळत आहे. जी परिस्थिती मे महिन्यात असायची ती सप्टेंबरमध्ये आहे.
तीन दिवसांपूर्वी तापमान वाढल्याने इराकमध्ये लॉकडाउन करण्यात आले होते. आज ५० अंश तापमान असतानाही अमेरिका थंड देश आहे. २०३० मध्ये काय परिस्थिती असेल हे सांगणे कठीण आहे. पाऊस पडला तरी विनाश आणि पाऊस पडला नाही तरीही विनाश. परिणामी, गहू आणि तांदळाचे उत्पादन ४०टक्क्यांनी घटले आहे. दरम्यान, काटोल, नरखेड विधानसभा मतदारसंघातील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, वैद्यकीय, कृषी, क्रीडा, पत्रकारितेत विशेष कार्य करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. संचालन देवीदास कठाणे यांनी केले. प्रास्ताविक कृषिमित्र दिनेश ठाकरे यांनी केले. आभार विजय महाजन यांनी मानले. यावेळी काटोल, नरखेड तालुक्यांतील नागरिकांची बहुसंख्येने उपस्थिती होती.
विकासकामे करून ऋण फेडणार : ठाकूर
काटोल, नरखेड, सावरगाव, पारडसिंगा, जलालखेडा, मोवाड व इतर गावांतून मोठ्या संख्येने कार्यकर्ते व त्यांच्या प्रियजनांनी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती. ठाकूर यांनी मनोगतात सांगितले की, सर्व समस्या सोडविण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आपल्या प्रेमाचे ऋण विकासकामे करून फेडेल, असा शब्द त्यांनी दिला.