चन्द्रपुर जिल्ह्यातील दाबगांव येथे भाउजी घोंगड़े यांच्या शेतातील विहीरीत चार साडेचार महिन्याचा बाघाचा बछड़ा पडलेला आढळला
चन्द्रपुर:- दि. 21एप्रिल आज पहाटे 8:30 च्या दरम्यान मूल तालुक्यातील दाबगाव येथे भाउजी घोंगड़े याचे शेतातील विहीरीत चार साडेचार महिन्याचा वाघाचा बछडा पडलेला आढळला. ही माहिती त्वरित चिचपल्ली वन परिक्षेत्र अधिकारी वैभव राजुरकर यांना देण्यात आली. माहिती मिळताच वन परिक्षेत्र अधिकारी घटनास्थली रवाना झाले. मूल येतील संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्य उमेशसिंह झिरे, मनोज रणदिवे , पंकज उजवने , राहुल जिरकुंटवार, प्रशांत मुत्यारपवार, स्वप्निल आक्केवार, अंकुश वाणी , प्रतिक लेनगुरे , संकल्प गनवीर , यश मोहुर्ले, हे सुद्धा घटनास्थली त्वरित उपस्थित झाले. अतिशीघ्र कृतिदल चन्द्रपुर व अतिशीघ्र कृतिदल ताडोबाचे राजू बड़केलवार , अजय मराठे व टीम यांनी विभागीय वनअधिकारी सारिका जगताप मैडम यांच्या मार्गदर्शनात वाघाच्या बछडाला सुखरूप विहीरितुन बाहेर काढले. वाघाच्या बछडाला चन्द्रपुर येथील प्राणी उपचार केंद्रात नेण्यात आले आहे. या सर्व कार्यवाही दरम्यान सहाय्यक वनसंरक्षक श्रीनिवास लखमावाड , आर.एफ.ओ. कारेकार , डॉ. पोड़चलवार क्षेत्र सहाय्यक खनके , क्षेत्र सहाय्यक मेश्राम , वनरक्षक गुरनुले , मानकर, मरसकोले, रोगे, मडावी मैडम व पोलिस दलातील लोक उपस्थित होते.
अमोल बल्कि
चन्द्रपुर जिल्हा
न्यूज रिपोर्टर