चंद्रपूर येथे महिला मेळाव्याला प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सरांसोबत चरणदास इंगोले यांचे उपस्थिती

दिनांक 30 नोव्हेंबर बुधवार रोजी पीपल्स रिपब्लिकन पार्टी प्रणित रमाई महिला ब्रिगेड चंद्रपूर शाखेच्या वतीने महसूल भवन येथे दुपारी तीन वाजता आदरणीय प्राध्यापक जोगेंद्रजी कवाडे सर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली युवा नेते भाई जयदीप कवाडे आणि प्रदेश कार्याध्यक्ष चरणदास इंगोले यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आलेल्या महिला सक्षमीकरण मेळाव्याचे उद्घाटन रमाई ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष रत्नाताई मोहोड यांच्या हस्ते करण्यात आले तर मेळ्याचे अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष हरीशभाई दुर्योधन होते त्याचं प्रमाणे पिरीपा चे विदर्भ उपाध्यक्ष सुमेध मुरमाडकर
तसेच युवा नेते सिद्धार्थ सोनटक्के
हे होते मेळाव्याच्या ठिकाणी डी एस माथने चंद्रपूर जिल्ह्याचे कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली येणाऱ्या सर्व पाहुण्यांचे अभिनंदन करण्यात आले संयोजिका वंदनाताई सूर्यवंशी यांनी घेतलेल्या मेळाव्याला मोठ्या संख्येने महिलाची उपस्थिती होती.