चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्र ,चंद्रपूर येथे घडला महिलेवर विनयभंगाचा प्रकार. . .
सदानंद पि.देवगडे(ज्यू.न्यूज रिपोर्टर) सविस्तर वृत्त असे आहे की दिनांक २०/०६/ २०२४ ला सकाळी ९:३० वाजता चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्र चंद्रपूर येथील सी. एच. पी.- बी मधील एम /एस शिवानी कॉन्ट्रॅक्टर्स अँड सप्लायर्स या आस्थापनेत क्लिनिंग या कंत्राटात कार्यरत असलेली महिला कामगार श्रीमती मंदा राजकुमार कन्नाके ही कॅन्टीनमध्ये दोन महिलेसोबत चाय घेतल्यानंतर जवळच्या मशीन मागे एकटीच लघु शौच्यास बसली असता सुपरवायझर शालिक राखडे हा सामोर येऊन त्या स्थितीमध्ये तिला वाकून बघितले व मोबाईल ने तिचा फोटो घेतला व तिथून निघून गेला. श्रीमती मंदा राजकुमार कन्नाके ही सुपरवायझरच्या मागे जाऊन त्याला माझे अश्लील फोटो का काढले या संदर्भात विचारणा केली असता सुपरवायझर शालिक राखडे यांनी तिला तू याच लायकीची आहेस असे म्हणून तिला अश्लील व जातिवाचक शिवी-गाड केली व छातीवर हाताने धक्का दिला. तेवढ्या मध्ये त्या दोन महिला तिथे आल्या व सुपरवायझर शालिक राखडे तिथून निघून गेला . श्रीमती मंदा राजकुमार कन्नाके हिने दुसरे सुपरवायझर विजयसिंह ठाकूर यांना सदर प्रकरण सांगितले असता विजयसिंह ठाकूर यांनी कंपनीचे मालक अभिजीत डांगे यांच्या घरी दोघांनाही बोलून प्रकरणाच्या निवाडा लागू असे सांगितले .दिनांक २५/४/२०२४ ला दुपारी ४:०० वाजता कंपनी चे मालक अभिजित डांगे यांच्या घरी दोघांनाही बोलवले असता सुपरवायझर शालिक राखडे यांनी श्रीमती मंदा राजकुमार कन्नाके हिच्यावर केलेल्या अन्यायासंदर्भात गुन्हा मंजूर न करता व झालेल्या गलतीची माफी न मागल्यामुळे श्रीमती मंदा राजकुमार कन्नाके हिने दिनांक २५ /६/३०२४ ला सदर प्रकरना संदर्भात न्याय मागण्या करीता दुर्गापूर पोलीस स्टेशन गाठले व आरोपी शालिक राखडे यांच्या विरोधात तक्रार नोंदवली पोलीस स्टेशन दुर्गापुर तर्फे पुढील तपास सुरू आहे सदर प्रकरणासंदर्भात न्याय मिळवून देण्याकरिता प्रताडीत महिला मंदा राजकुमार कन्नाके हिने महाराष्ट्र राज्य विज निर्मिती रोजंदारी मजूर सेना संलग्न न्यू ट्रेड युनियन चे केंद्रीय प्रभारी माननीय भाई सुभाष सिंग बावरे व जिल्हाध्यक्ष माननीय भाई सदानंद देवगडे यांच्याकडे धाव घेतली व संघटनेमार्फत योग्य कार्यवाही करून आरोपी शालिक राखडे यांचे चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्र येथील गेट पास रद्द करण्याची लेखी तक्रारीद्वारे मागणी केलेली आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती रोजंदारी मजदूर सेनेचे जिल्हाध्यक्ष माननीय भाई सदानंद देवगडे तसेच केंद्रीय प्रभारी माननीय सुभाषिक बावरे यांनी श्रीमती मंदा राजकुमार कन्नाके हिला संघटनेमार्फत न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले .सदर प्रकरणात चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र प्रशासनाकडून त्या महिलेस न्याय मिळते की नाही याकडे सर्वांचे लक्ष वेधलेले आहे.