चंद्रपूर ब्रेकिंग : घुग्घुस येथे महिलेवर अत्याचार : आज सकाळची दुर्दैवी घटना : आरोपीचे नाव मोहम्मद यासिन चा शोध सूरू : परिसरात तणावाचे वातावरण #376

चंद्रपूर :
65 वर्षीय महिला पहाटे शौचास गेली असता तिच्यावर एका नाराधमाने अत्याचार केल्याची घटना घुग्घुस येथे घडली. या प्रकरणात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. आरोपीचे नाव मोहम्मद यासिन असे आहे.
पीडित महिला घुग्घुस येथे शांतीनगर येथील निवासी आहे. ही महिला आपला पती, मुलगा आणि सुनेसोबत राहते. कुटुंब मजुरीने उदरनिर्वाह करते. आज सकाळी साडेपाच वाजता ही महिला आपल्या घरामागे गेली असता मोहम्मद यासिन या आरोपीने तिच्यावर अत्याचार केला.
याप्रकरणी घुग्घुस पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी आरोपीविरोधात भादवी कलम 354 (अ), 376, 506 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींला ताब्यात घेण्यात आले असून चौकशी सुरू आहे. लवकरच त्याला अटक केली जाईल. यामुळे घुग्घुस परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विक्की नगराळे
तालुका व चंद्रपुर
शहर प्रतिनिधी
चंद्रपुर