BREAKING NEWS:
चन्द्रपुर महाराष्ट्र हेडलाइन

चंद्रपूर बसस्थानकावरील सुलभ शौचालयात प्रवाशांची लूट; पाच रुपयांऐवजी घेतात दहा रुपये

Summary

चंद्रपूर: येथील मुख्य बसस्थानकावरील सुलभ शौचालयात प्रवाशांकडून शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त पैसे उकळले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील फलकावर शौचालयासाठी ५ रुपये दर लिहिलेला असतानाही, तिथले कर्मचारी प्रवाशांकडून १० रुपये घेत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. […]

चंद्रपूर: येथील मुख्य बसस्थानकावरील सुलभ शौचालयात प्रवाशांकडून शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त पैसे उकळले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील फलकावर शौचालयासाठी ५ रुपये दर लिहिलेला असतानाही, तिथले कर्मचारी प्रवाशांकडून १० रुपये घेत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.
​’पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क’चे प्रतिनिधी रहमान अली यांनी या प्रकरणाचा आढावा घेतला असता असे दिसून आले की, जेव्हा प्रवाशांनी वाढीव दराबाबत विचारणा केली आणि अधिकृत पावती (स्लिप) मागितली, तेव्हा संबंधित कर्मचाऱ्यांनी “आमच्याकडे पावती नाही, तुम्हाला जे करायचे आहे ते करा,” अशा उद्धट भाषेत उत्तरे दिली.
​बसस्थानकासारख्या सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या या उघड लुटीमुळे प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित कंत्राटदारावर कडक कारवाई करावी, अशी मागणी ‘पोलीस योद्धा न्यूज’च्या माध्यमातून करण्यात आली आहे.

​बातमी: रहमान अली, पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क, चंद्रपूर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *