चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी व अतिदुर्गम भागातील कर्मचाऱ्यांना लाभ व सवलती पूर्ववत
चंद्रपूर : पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार,
घनदाट जंगलाने व्यापलेल्या व मागासलेल्या चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत महानिर्मिती कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिळणारे लाभ, सोयी व सवलती पूर्ववत सुरू ठेवण्याची मागणी बहुजन पॉवर कर्मचारी संघटना, सीएसटीपीएस शाखेकडून करण्यात आली आहे.
प्रशासकीय परिपत्रक क्रमांक ५७५ दिनांक २५ जुलै २०२५ तसेच महाराष्ट्र शासनाचे संबंधित परिपत्रक व शासन निर्णयांचा दाखला देत, आदिवासी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवासस्थान, प्रोत्साहन भत्ता, बदलीसाठी पसंती आणि एकस्तर वेतनश्रेणी/पदोन्नती यांसारखे लाभ चालू ठेवावेत, असे संघटनेने स्पष्ट केले आहे.
मुख्य मागण्या
निवासस्थान सवलत : मूळ ठिकाणचे निवासस्थान ३ वर्षे किंवा सेवा कालावधीपर्यंत ठेवण्याची मुभा, आदिवासी क्षेत्रातील घराकरिता केवळ सेवा शुल्क आकारणी.
प्रोत्साहन भत्ता : दरमहा ₹१५००/- प्रोत्साहन भत्ता देण्याची बंधनकारक अंमलबजावणी.
बदलीसाठी प्राधान्य : आदिवासी क्षेत्रात ठरावीक काळ चांगले काम केलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या जिल्ह्यात बदलीची संधी.
एकस्तर पदोन्नती : आदिवासी व नक्षलग्रस्त क्षेत्रात कार्यरत असताना मूळ पदापेक्षा वरिष्ठ पदाची वेतनश्रेणी देण्याची अंमलबजावणी.
संघटनेचे म्हणणे आहे की, वैतरणा व घाटघर जलविद्युत केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या आदिवासी क्षेत्रातील सवलतीप्रमाणेच, चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील कर्मचाऱ्यांनाही या सवलती लागू कराव्यात. यामुळे सर्व कर्मचाऱ्यांमध्ये एकसमान न्याय होईल व कोणत्याही प्रकारचा दुजाभाव राहणार नाही.
संकलन
श्री राजकुमार खोब्रागडे
मुख्य संपादक तथा डायरेक्टर
पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क
