चन्द्रपुर महाराष्ट्र हेडलाइन

चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशन निवडणूक २०२६–२०२८ साठी रणधुमाळी; वकिलांच्या हक्क, प्रगतीसाठी एकजूट दाखवण्याचे आवाहन

Summary

चंद्रपूर | प्रतिनिधी चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशन, चंद्रपूर यांच्या २०२६–२०२८ या कार्यकाळासाठी होणाऱ्या निवडणुकीची प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आली असून, वकिलांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. बार असोसिएशनच्या नेतृत्वासाठी विविध पदांवर उमेदवार रिंगणात उतरले असून, “वकिली हाच आपला पक्ष, वकिलांची […]

चंद्रपूर | प्रतिनिधी
चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशन, चंद्रपूर यांच्या २०२६–२०२८ या कार्यकाळासाठी होणाऱ्या निवडणुकीची प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आली असून, वकिलांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. बार असोसिएशनच्या नेतृत्वासाठी विविध पदांवर उमेदवार रिंगणात उतरले असून, “वकिली हाच आपला पक्ष, वकिलांची प्रगती हेच आपले ध्येय” या विचारधारेसह सर्व उमेदवारांनी प्रचाराला वेग दिला आहे.
या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी ॲड. विक्रम टंडन, तर उपाध्यक्षपदासाठी ॲड. अमन मारेकर हे उमेदवार मैदानात आहेत. सचिवपदासाठी ॲड. अभिजीत किन्हीकर, सहसचिवपदासाठी ॲड. तृप्ती मांडवगडे, कोषाध्यक्षपदासाठी ॲड. मुर्लीधर बावनकर, तर ग्रंथपालपदासाठी ॲड. राहुल थोरात यांनी उमेदवारी दाखल केली आहे.
महिला प्रतिनिधित्वाला प्राधान्य देत महिला राखीव गटातून ॲड. सरोज कदम, ॲड. राजलक्ष्मी रामटेके व ॲड. महेश्वरी सोनुले या उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तसेच सदस्य पदासाठी ॲड. सपना शेट्टी, ॲड. आकाश गिरी, ॲड. वर्षा उपाध्याय, ॲड. शरीफ मिर्जा, ॲड. स्वाती समर्थ, ॲड. तोषित किन्नाके, ॲड. सुरेश दुर्गम, ॲड. अमोल वैद्य, ॲड. मनोज मिश्रा, ॲड. उमेश बागेसर, ॲड. सोपान जवंजार आणि ॲड. प्रतिभा येलेकर हे उमेदवार उभे आहेत.
निवडणूक दि. ०९ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८.०० ते दुपारी ४.०० या वेळेत पार पडणार असून, सर्व वकिलांनी आपला बहुमूल्य मताधिकार बजावून उमेदवारांना मोठ्या बहुमताने विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बार असोसिएशनच्या माध्यमातून वकिलांचे प्रश्न, न्यायालयीन सुविधा, व्यावसायिक प्रगती आणि एकसंध संघटन मजबूत करण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे मतदान नक्की करा आणि वकिलांच्या एकतेचा, ताकदीचा प्रत्यय दाखवा, असे आवाहन प्रचारादरम्यान करण्यात येत आहे.

संकलन:- श्री राजकुमार खोब्रागडे, मुख्य संपादक तथा डायरेक्टर, पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *