चंद्रपूरमहाऔष्णिक विज केंद्र व्यवस्थापणाचा अंदाधुंद कारभार पोलीस योध्दा न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार
Summary
सिटीपिएस हे आशिया खंडातील मोठी विज उत्पादन करणारे विद्युत केंद्र आहे. तेथील कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी वसाहत असून वसाहतीचे देखभाल करण्यासाठी स्थापत्य आणि विद्युत परिरक्षण असे दोन स्वतंत्र विभाग आहेत. या वसाहतीत व्यवस्थापणाच्या आशिर्वादाने गैरपध्दतीने किराया तत्वावर लोक राहतात. मात्र मागील दहा […]
सिटीपिएस हे आशिया खंडातील मोठी विज उत्पादन करणारे विद्युत केंद्र आहे. तेथील कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी वसाहत असून वसाहतीचे देखभाल करण्यासाठी स्थापत्य आणि विद्युत परिरक्षण असे दोन स्वतंत्र विभाग आहेत. या वसाहतीत व्यवस्थापणाच्या आशिर्वादाने गैरपध्दतीने किराया तत्वावर लोक राहतात. मात्र मागील दहा पंधरा वर्षांपासून एकावरही कारवाही झाली नाही.
या वसाहतीतील विद्युत बिल आकारणीचे काम विद्युत परिरक्षण विभाग (वसाहत)यांच्याकडे आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार क्वार्टर F,SF,E,D,C,B आणि A अशी रचना असून पदानुसार ते आवंटीत करण्यात येते.नवलाची बाब अशी की काही अधिकारी,अभियंते आणि कर्मचारी यांचे मासिक विज बिल किमान शंभर ते दोनशे रुपये येते तर काहींना हजार दोन हजाराच्या घरात असते.अनेक वर्षांपासून मिटर बदलण्यात आलेले नाहीत याचा आर्थिक भुर्दंड अनेकांना सोसावा लागत आहे.
जिल्हा दारुबंदी असतांनाच वसाहतीत खुलेआम अवैध दारुविक्री सुरु असुन ऊर्जानगरात रस्त्याच्या कडेला,बगीच्यात दारु पिऊन बाटल्या फेकलेल्या दिसतात याकडे स्थानिक व्यवस्थापणाचे लक्ष नाही.ही बाब वसाहती राहणाऱ्या सामान्य कर्मचाऱ्यांना त्रासदायक ठरत असून कुंटूब प्रमुख या नात्याने मा.पंकज सपाटे (मुख्य अभियंता) यांनी वसाहतीतील कर्मचाऱ्यांना भरमसाठ येणाऱ्या विज बिलाबाबत आणि अवैध दारु विक्रेत्यांना प्रतिबंधात्मक उपाय योजना करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
कोविड-19च्या काळामध्ये कित्येक कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्गजन्य रोग झाल्याने आपले प्राण गमवावे लागले,पण तिथल्या मुख्य अभियंता श्रीमान पंकज सपाटे यांनी कोविड सेंटर उभारणी केली नाही. त्यामुळे कित्येक कर्मचाऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले व पुष्कळसे परिवार उद्ध्वस्त झाले.
केन्द्र सरकार ने ह्या बाबिकडे लक्ष देण्याची गरज आहे.