चन्द्रपुर महाराष्ट्र हेडलाइन

चंद्रपुर महाऔष्णीक विद्युत निर्मिती कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीची कामगारांच्या समस्यासंदर्भात चंद्रपूर महा औष्णिक विद्युत केंद्राचे मा . मुख्य अभियंता व प्रशासनासोबत सकारात्मक चर्चा!

Summary

चंद्रपुर :- उर्जानगर येथील चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रामधील ऊर्जाभवनातील झेप येथे आज दिनांक १० मे २०२४ रोज शुक्रवारला दु. ४:०० वा. मा. मुख्य अभियंता कुमरवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व शिवसेना चंद्रपुर जिल्हा प्रमुख तथा महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक व कंत्राटी […]

चंद्रपुर :- उर्जानगर येथील चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रामधील ऊर्जाभवनातील झेप येथे आज दिनांक १० मे २०२४ रोज शुक्रवारला दु. ४:०० वा. मा. मुख्य अभियंता कुमरवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व शिवसेना चंद्रपुर जिल्हा प्रमुख तथा महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक व कंत्राटी कामगार सेना संस्थापक अध्यक्ष बंडूभाऊ हजारे तसेच शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख तथा शिवसेना भारतीय कामगार संघटना ,चंद्रपुर जिल्हाध्यक्ष ,संतोष पारखी यांच्या प्रमुख उपस्थितीत चंद्रपुर महाऔष्णीक विद्युत निर्मिती कामगार संघटना संयुक्त कृती समिती चे अध्यक्ष मा.भाई सदानंद पि.देवगडे व नवनियुक्त पदाधिकारी ओळख व भविष्यातील कामगारांच्या समस्या निकाली काढण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा करण्यात आली.

सदर चंद्रपुर महाऔष्णीक विद्युत निर्मिती कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष मा. भाई सदानंद देवगडे, सचिव मा. युवराज मैंद, उपाध्यक्ष मा. प्रमोद कोलारकर, उपाध्यक्ष मा. हेरमन जोसेफ, उपाध्यक्ष मा. निताई घोष, उपाध्यक्ष मा. संघपाल धोटे, कार्याध्यक्ष मा. शंकर बागेसर, संघटक मा.संतोष ढोक, कोषाध्यक्ष, मा.मंगेश चौधरी, सह संघटक मा. नितिन वाढई , सहसचिव मा. प्रफुल्ल सागोरे, प्रसिद्धी प्रमुख मा. रवि पवार, सल्लागार मा. वामन बुटले, सल्लागार मा. वामन मानकर यांची तसेच कार्यकारिणी सदस्य मा. अशोक गिलबिले, कार्यकारणी सदस्या मा. कु. ताराबाई आत्राम यांची सर्व 16 कामगार संघटना मिळून सर्वानुमते बिनविरोध निवडीबद्दल मा. मुख्य अभियंता कुमरवार साहेब यांनी हार्दिक अभिनंदन करुन कामगारांच्या समस्या निकाली काढण्यास प्रथम प्राध्यान्य देण्याची ग्वाही दिली.

दरम्यान नियोजीत बैठकीत चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे मा. उप मुख्य अभियंता शिंदे साहेब, उपमुख्य अभियंता मा. खूटेमाटे साहेब , मा. उप मुख्य अभियंता राजूरकर साहेब तसेच कामगार कल्याण अधिकारी वंजारी साहेब व कामगार पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *