चंद्रपुर महाऔषानिक विद्युत विज केंद्र, उर्जानगर चंद्रपुर
नववर्षाची सुरुवात होऊन जेमतेम 2 महीने होत नाहीं, तोच कोरोना विषाणु चा शिरकाव आपल्या देशात सुद्धा झाला आणि मार्च महिन्या अखेर देशात टाळेबंदी घोषित करण्यात आली
या महामारीचा शिरकाव टप्प्या टप्प्याने वाढत असताना, विज निर्मिति अखंडित न करता व समस्त अधिकारी – कर्मचारी वास्तव्यात असलेल्या उर्जानगर वसाहतीची देखरेख व योग्य सामान्यवयस्क राखण्यास कोरोना कंट्रोल टीम प्रशाशना द्वारे तयार करण्यात आली
मार्च च्या अखेरिस पासून तर आज पर्यन्त आमच्या टीम ने जीवाची बाजी लाऊंन स्वयंफ़ुर्ती ने कामे केली
या मधे, सुरुवातीला गरीब व गरजु लोकांपर्यंत राशन किट व तयार फ़ूड पैकेट पोहोचविणे है अविरत एक महिन्या पर्यन्त सुरु ठेवले.
दररोज 500 गरजू लोकांना जेवन व 1000 राशन किट वितरित करण्यात आले, या मधे ctps प्रशाशनाचे बहुमोलाचे योगदान लाभले.
त्यानंतर कोरोना चा शिरकाव वसहतीमधे रोखण्यासाठी अगदी जिद्दीने टीम मेंबर जुटली.
राजकुमार गिमेकर, पारस कांबळे, शब्बीर शेख, शत्रुघ्न येरगुडे, याशील सातरडे, विशेश्वर मड़ावी, जगदेव सपकाळ, गजानन पांडे, भोजराज शिंदे, विशाल इंगले, हेमंत इटनकर, नीतीश लोहकरे ई. योद्धा यांचा उतुस्फूर्त सहभाग लाभला.
परजिल्ह्यातून व इतर राज्य मधून आलेल्या सर्व लोकांचे गृह व संस्थात्मक विलागिकरण करुण त्यांची योग्य ती काळजी घेणे, संपूर्ण वसाहती मधील रहिवासी यांची थर्मल स्कैनिंग करुण डेटा तैयार करने, काही लक्षणे आढळल्यास त्वरित प्राथमिक आरोग्य केंद्र येथे संपर्क साधुन त्यांच्या टेस्टिंग करिता पाठपुरावा करणे.
ज्या क्वार्टर मधे पॉजिटिव व्यक्ति आढळून आले त्या गाळ्याचे निरजंतुकरण करने व इतर रहिवासी यांचा विश्वास संपादन करणे व मनोबल वाढविने, हे काम टीम ने योग्यरित्या केले
आजच्या घडिला पॉजिटिव लोकांची संख्या वाढत असताना टीम न डगमगता अविरत आपली सेवा देत आहे.