BREAKING NEWS:
चन्द्रपुर महाराष्ट्र हेडलाइन

चंद्रपुरात रेती तस्करांचा धुमाकूळ! आरपीआय कार्याध्यक्ष रेहबर अली यांचा तहसील प्रशासनावर गंभीर आरोप; तहसीलदारांनी फोन उचलणेही केले बंद! ​पहाटे ४ वाजता उघड्या डोळ्यांनी शासनाच्या संपत्तीची लूट; जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी तातडीने लक्ष देण्याची मागणी

Summary

चंद्रपूर: चंद्रपूर शहर आणि परिसरात रेती तस्करांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, या तस्करांना कोणाचे अभय लाभले आहे, असा संतप्त सवाल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) चे जिल्हा कार्याध्यक्ष रेहबर अली यांनी उपस्थित केला आहे. तहसील कार्यालयासमोरून रोज पहाटे डझनभर रेतीची […]

चंद्रपूर:
चंद्रपूर शहर आणि परिसरात रेती तस्करांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, या तस्करांना कोणाचे अभय लाभले आहे, असा संतप्त सवाल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) चे जिल्हा कार्याध्यक्ष रेहबर अली यांनी उपस्थित केला आहे. तहसील कार्यालयासमोरून रोज पहाटे डझनभर रेतीची वाहने विनापरवाना धावत असतानाही प्रशासन सुस्त असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
​तहसीलदारांचा टोलवाटोलवीचा कारभार?
​रेहबर अली यांनी दिलेल्या माहितीनुसार, एन.के. दुर्गापूर, रेतोरी आणि परिसरातील नदीपात्रातून रोज पहाटे ४ ते ५ च्या सुमारास ८ ते १० ट्रक आणि गाड्या विनापरवाना रेतीची वाहतूक करत आहेत. विशेष म्हणजे, या गाड्या थेट तहसील कार्यालयासमोरून जात असतानाही कोणतीही कारवाई होत नाही. रेहबर अली यांनी स्वतः तहसीलदारांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तहसीलदारांनी फोन उचलणेही बंद केले आहे, असा धक्कादायक आरोप त्यांनी केला आहे.
​रेती तस्करांमुळे सकाळी फिरणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका!
​पहाटेच्या वेळी अनेक नागरिक मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडतात. याच वेळी रेती तस्करांच्या भरधाव गाड्या अतिशय वेगाने आणि नियमांचे उल्लंघन करून धावत असतात. जर भविष्यात एखादा अपघात झाला किंवा कोणाचा बळी गेला, तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न रेहबर अली यांनी विचारला आहे.
​पुराव्यासह ‘पोलिस योद्धा’कडे तक्रार
​रेहबर अली यांनी काही वाहनांचे क्रमांकही पुराव्यासह दिले आहेत. यामध्ये:
​टाटा गुड्स कॅरिअर (MH-34 A-5219)
​मारुती इको (MH-34 CJ-0035)
​मारुती इको (MH-34 CJ-7460)
या वाहनांच्या माध्यमातून विनापरवाना रेतीची वाहतूक होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
​जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करावा!
​जिल्हाधिकारी विनय गौडा साहेब आणि लाखांदूरचे तहसीलदार वैभव पवार यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन अवैध रेती उपसा आणि वाहतुकीवर तात्काळ बंदी आणावी, अशी मागणी रेहबर अली यांनी केली आहे. अन्यथा, या भ्रष्ट कारभाराविरोधात आरपीआयच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

​वृत्त संकलन: पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
📢 वेबमीडिया: www.policeyoddha.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *