चंदन मेश्राम मित्र परिवार द्वारे बुद्ध पौर्णिमा थाटात साजरी
कन्हान : – चंदन मेश्राम मित्र परिवार द्वारे बुद्ध पौर्णिमा निमित्य गांधी चौक कन्हान येथे तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेला माल्यार्पण व पुष्प अर्पित करुन नागरिकांना मास्क, अन्न धान्य वाटप करुन बुद्ध पौर्णिमा थाटात साजरी करण्यात आली.
बुधवार (दि.२६) मे २०२१ ला बुद्ध पौर्णिमा निमित्य चंदन मेश्राम मित्र परिवार द्वारे गांधी चौक येथे कार्यक्रमाचे अध्यक्ष काॅंग्रेस कमेटी कन्हान शहर महिला अध्यक्ष रिता बर्वे व प्रमुख अतिथी कन्हान पोलीस स्टेशनचे पो उप नि अमितकुमार आत्राम यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली . उपस्थित नागरिकांना मास्क, अन्न धान्य वाटप करण्यात आले. उपस्थित सर्व नागरिकांनी तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमे ला पुष्प अर्पित करुन बुद्ध वंदना करीत बुद्ध पौर्णिमा थाटात साजरी करण्यात आली. याप्रसंगी कन्हान पोलीस स्टेशनचे हेकॉ जयलाल सहारे, विरेंन्द्र चौधरी, रोहित बर्वे, चंदन मेश्राम, दिपक तिवाडे, सुमित जांबुळकर, दामु पात्रे, प्रकाश देवांघण, गणेश खांडेकर , विनोद मसार, महाविर यादव, क्रिष्णा रोडेकर, अक्षय फुले सह नागरिक उपस्थित होते.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535