चंदनपारडी सड़क खड्ड्यात की खड्ड्यात सड़क? बॉक्स 👇
नागपूर जिल्ह्यातील चंदनपारडी सह अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्यावरून जात असताना रस्त्यात खड्डा आहे,की खड्ड्यात रस्ता हेच लोकांना समजत नाही. या प्रशासनाला वारंवार तक्रारी देवून देखील त्याची दखल घेतली जात नाही, नागपूर जिल्ह्यातील महामार्ग ते चंदनपारडी रस्त्याची झालेल्या दुरावस्थे कडे नव निर्वाचित आमदार/खासदारांनी लक्ष द्यावे अशी मागणी चंदणपार्डी चे उप सरपंच रवींद्र गुंड यांनी केली आहे.]
कोंढाळी/काटोल
नागपूर जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर वसलेल्या काटोल तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 (6)ते चंदनपारडी या (रस्त्याची) सड़केची अत्यंत वाईट अवस्था झाली असून वर्षानुवर्षे हा रस्ता दुर्लक्षित राहिला असल्याचे सांगितले जात आहे. चार ते पाच गावांना जोडणाऱ्या या रस्त्याची चाळण झाली असून मोठ – मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनधारक,शेतकरी,विद्यार्थी,महिला यांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे.अशी माहिती उपसरपंच रविंद्र गुंड यांनी दिली आहे.
यासडकेची( रस्त्याची) प्रचंड प्रमाणात दुरावस्था झाली असून रस्त्यात खड्डा कि खड्ड्यात रस्ता हेच लोकांना समजेना गेले आहे. प्रशासनाकडे रस्त्याच्या दुरावस्थे संबंधी वारंवार निवेदने देवून ही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने ग्रामस्थांकडून ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. प्रशासन काय भूमिका घेतेय याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
ग्रामीण भागातील रस्ते गाव खेड्यांना जोडणारे महत्वाचे साधन
रस्ते गाव खेड्यांना जोडणारे महत्वाचे साधने असून गाव खेड्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात महत्वाची भूमिका बजावत आहेत. शेतात पिकवला जाणाऱ्या माल याच रस्त्याने शहरातील मार्केटला पाठविला जातो. जर रस्ते चांगले असतील तर दळणवळण अतिशय सुलभ होवून गावचा विकास होण्यास मदत होते. गावची पारख रस्त्यावरून केली जात असून गावाला जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता नसेल तर या गावाकडे वाहन धारक देखील येण्यास टाळाटाळ करतात. लहान – सहान व्यवसायिक देखील या गावाकडे फिरकत नाही. त्यामुळे गावाला अपरिमित अशा नुकसानीला सामोरे जावे लागते. असाच प्रकार नागपूर मुंबई महामार्ग चे चंदनपारडी फाटा ते चंदनपारडी गाव व त्या मार्गावरील अनेक गावांना जोडणाऱ्या या सडकेच्या बाबतीत घडला असून या सडकेला जोडणाऱ्या गावांचे नागरिक /शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे.
ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांची दुरावस्था
कोंढाळी लगतच्या क्षेत्रातील ग्रामीण भागातील गावा गावांना जोडणाऱ्या अनेक गावांचे रस्त्यांची दुरावस्था झाल्या असल्याच्या बातम्या देखील प्रसिद्ध झाल्या आहेत. या भागातील ग्रामीण भागातील अशी स्थिती असेल तर आदिवासी भागातील रस्त्यांचा विचारच करायला नको,असे अनेकांना वाटते. या रस्त्यावरून जात असताना रस्त्यात खड्डा आहे,की खड्ड्यात रस्ता हेच लोकांना समजून येत नाही. या याबाबत प्रशासनाला वारंवार तक्रारी देवून देखील त्याची दखल घेतली जात नसल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येते. मध्यंतरी वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचा असलेला मुंबई – गोवा महामार्ग हा रस्ता कमी आणि खड्डे जास्त दिसून आला होता. याबाबत अनेकांनी आवाज उठवल्यानंतर मार्ग बांधणी चे काम करण्यात आले. मात्र चंदन पारडी मार्गावर आजी माजी आमदारांची वक्रदृष्टी कां? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
चंदनपारडी सड़क रस्त्यांची अशीच परस्थिती अनेक रस्त्यांची आहे. रस्त्यांच्या देखभालीसाठी स्वतंत्र विभाग असून ही रस्त्याची समस्या वर्षानुवर्षे भेडसावत आहे.
नागपूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणचे रस्ते खराब
असाच प्रकार जिल्ह्यातील ग्रामीण भागातील चिखली(मासोद) ते वर्धा जिल्ह्यातील नागाझरी जोड सडके पर्यंत चा रस्त्यांची ही चाळण झाली आहे. या रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने सर्व सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा निवेदने देवून ही दखल घेतली जात नसल्याने गावकऱ्यातून नाराजीचा सूर ऐकायला मिळत आहे.
अष्ठे ते खूनेशवर रस्त्याची झाली दुरावस्था
महामार्ग ते चंदनपारडी , काटोल मार्ग ते खापा(सोनार)नांदोरा, महामार्ग ते जामगढ़,कोंढाळी-दोडकी -पुसागोंदी -घुबडी या गावांना जोडणाऱ्या रस्त्यावर सुमारे बारा – तेरा गावे वसलेली असून या गावातील नागरिक काटोल -कोंढाळी-नागपूरयेथे जाण्यासाठी याच रस्त्याचा वर्षानुवर्षे वापर करत आहेत. हा रस्ता लोकांच्या नेहमीच्या रहदारीचा असून देखील प्रशासनाकडून दुर्लक्षित राहिलेला आहे. जसा रस्ता तयार करण्यात आला आहे, तसा रस्ता दुरुस्त करण्यात आला नसल्याचे या भागातील नागरिक सांगतात. या रस्त्यावर मोठ – मोठे खड्डे पडले असून वाहन धारकाना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. रस्त्यावर मोठ – मोठे खड्डे पडल्याने दुचाकी, चारचाकी वाहने ही चालवता येत नाही. चंदनपारडी चे सरपंच बंडू उईके व उपसरपंच रवींद्र गुंड यांनी सांगितले की चंदनपारडी या मार्गाची दुरूस्ती ला मंजूरी मिळाली नाही तर विद्यार्थ्यांकरीता येणारी मानव विकास घ्या बस फेर्या ऐन परिक्षांचे तोंडावर या बस फेर्या कधी ही बंद पडू शकतात. तसेच हायवे ते जामगढ,खापा सोनार, कोंढाळी दोडकी पुसागोंदी या मार्गावरील गावांची उपजीविका शेतीवर अवलंबून असून वाहतुकीच्या दृष्टीने हा रस्ता अत्यंत महत्वाचा आहे. शेतकऱ्यांचा शेतातील माल विक्रीसाठी काटोल, कारंजा घाडगे, नागपूर, येथे पाठवण्यासाठी शेतकरी वाहन धारक या रस्त्याचा उपयोग असून अनेकदा माल खड्ड्यात आदळत असल्याने शेती मालाचे नुकसान होत आहेत. व्यवस्थितरीत्या माल मार्केटला गेला नसल्याने त्याला पैसे कमी मिळतात. माल घेवून मार्केटला वेगाने जाता येतही येत नाही. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे मार्केटला पोहचण्यास उशीर होत आहे. परिणामी शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही. दळण – वळण सुलभ व्हावे,यासाठी प्रशासनाने लक्ष द्यावे,असे ग्रामस्थांना वाटत आहे. अशी माहिती जुनापाणी जामगढ चे सरपंच किस्मत चौहान,
आजारी रुग्णांना दवाखान्यात घेवून जाताना होतोय त्रास
या रस्त्यावर असणाऱ्या गावातील नागरिकांना आजारी असणाऱ्या लोकांना दवाखान्यात घेवून जाताना विविध अडचणीचा सामना करावा लागत आहे. या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. गरोदर महिलांना या खड्डेमय रस्त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. या चार ते पाच गावातील नागरिक आजारी पडल्यास या रस्त्यामुळे रुग्ण वाहिका सुद्धा गावात येत नाहीत. असे भा ज पा मंत्री बाल किसन पालीवाल, प्रमोद धारपूरे व स्थानिक नागरिक सांगतात.
शेतकरी,विद्यार्थी-वाहन धारक यांना सहन करावा लागतोय त्रास
या रस्त्यावरून शेतकरी दूध घेवून जात असताना त्यांच्या दुधाचे कॅन पलटी होवू लागले आहेत. या रस्त्यावर दोन ते तीन फुटाचे खड्डे पडल्याने त्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून त्याचा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर या गावातील विद्यार्थी शाळा,कॉलेजला जाण्यासाठी या रस्त्याचा उपयोग करत असून त्यांना खड्डेमय रस्त्यामुळे वेळेवर शाळेत पोहचता येत नाही. वाहन धारकांना या रस्त्यावरून जात असताना प्रचंड प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. त्यांच्या वाहनाचे दररोज नुकसान होत असून रस्त्याचे काम लवकर करावे,अशी मागणी ग्रामस्थांतून केली जात आहे. अशी माहिती चिखली चे सरपंच राजकुमार चोपडे, खापा नांदोरा-सरपंच देवेंद्र मरसकोल्हे,पुसागोंदी चे माजी सरपंच रामचंद्र चव्हाण, हरिष राठोड, जामगढ जुनापानी सरपंच किस्मत चौहान यांनी दिली आहे.
बांधकाम विभाग
चंदनपारडी सडक बांधकाम किंवा दुरुस्ती बाबद काटोल चे बांधकाम उपविभागीय अधिकारी डी वाया गभणे यांना विचारले असताी त्यांनी सांगितले की या मार्गाची दुरूस्ती किंवा बांधणी करता निधी उपलब्ध करून दिली तर या मार्गांचे बांधकाम किंवा दुरूस्ती चे कंत्राट काढल्यावर कामाला सुरुवात केली जाऊ शकते.

