BREAKING NEWS:
महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

चंदगड तालुक्यात दुसरे पोलीस स्टेशन उभारण्यासंदर्भात शासन सकारात्मक – गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभुराज देसाई

Summary

मुंबई, दि. 7 : कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात दुसरे पोलीस स्टेशन उभारण्यासंदर्भात शासन सकारात्मक असून याबाबत उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे बैठक घेणार असल्याची माहिती गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभुराज देसाई यांनी दिली. गृह राज्यमंत्री श्री.देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक […]

मुंबई, दि. 7 : कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात दुसरे पोलीस स्टेशन उभारण्यासंदर्भात शासन सकारात्मक असून याबाबत उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे बैठक घेणार असल्याची माहिती गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभुराज देसाई यांनी दिली.

गृह राज्यमंत्री श्री.देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. बैठकीला आमदार राजेश पाटील, पोलीस महासंचालक संजय पांण्डेय, पोलीस महासंचालक (गृहनिर्माण) विवेक फणसळकर, गृह विभागाचे प्रधान सचिव संजय सक्सेना, अतिरिक्त पोलीस महासंचालक एस जगन्नाथन, वित्त विभागाचे सह सचिव विवेक दहीफळे, यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

गृह राज्यमंत्री श्री.देसाई म्हणाले, चंदगड हा भाग डोंगराळ असून पोलीस ठाण्यात पोहोचण्यासाठीचा वेळ वाचविण्यासाठी तसेच या भागातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी दुसरे पोलीस स्टेशन उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. या मागणीची दखल घेत कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथे दुसरे पोलीस स्टेशन आवश्यक मनुष्यबळासह सुरु करण्याबाबत शासन सकारात्मक असून त्यासाठी विशेष बाबमधून मंजूरी घेण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार, गृहमंत्री आणि गृहराज्यमंत्री (शहरे) यांची संयुक्त  बैठक घेण्यात येईल, असेही श्री. देसाई यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *