घर घर जल अभियानाचे कामात भ्रष्टाचार ची घर घर!! जल जीवन मिशन योजनां चे कामात गैरप्रकार!जि. प. अध्यक्षांनी केली कामां पाहणी. अधिकारी व कत्रांटदारांधरले धारेवर
कोंढाळी- प्रतिनिधी -दुर्गाप्रसाद पांडे
मासोद ग्राम पंचायतीचे सरपंच यांनी जल जीवन मिशन योजनेत गैरप्रकार रोखण्यासाठी उचलले पाऊल , जल जीवन मिशन योजनेत सुरू असलेले गैर प्रकारांची जन प्रतिनिधींना व संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांकडे तक्रारी केल्या या तक्रारीची दखल घेत नागपूर जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ताताई कोकर्डे संबधीत अधिकाऱ्यांना घेऊन ग्रा प मासोद व ग्राम पंचायत कामठी च्या जल जीवन मिशन योजनां च्या कामांची पाहणी केली . व घटनास्थळीच संबंधित अधिकारी व कंत्राटदाराला धारेवर धरले. या प्रसंगी कोंढाळी जिल्हा परिषद सदस्य पुष्पाताई चाफले, सरपंच रंजू बारंगे, पंचायत समिती सदस्य लताताई धारपुरे, उपसरपंच रूपराव गोंडाणे माजी सरपंच प्रकाश बारंगे तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते .
घर घर नळ कनेक्शन जोडनी चे कामात संबंधीत विभागाचे बांधकाम अधिकारी, शाखा अभियंता यांचे दुर्लक्ष, जल जीवन मिशन योजनांचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराचे मनमानी कारभारामुळे जल जीवन मिशन योजनेला घर घर लागल्याची तक्रार कचारी सावंगा ग्रा प चे सरपंच रवी जयस्वाल, तर मासोद येथील सरपंच रंजू बारंगे यांनी होती. या तक्रारीची दखल घेत जि प अध्यक्ष मुक्ताताई कोकर्डे व जि प सदस्य पुष्पाताई चाफले यांनी संबधीत विभागाचे अधिकार्यां सह कार्य स्थळांची पाहणी केली. तसेच अपूर्ण कामे नियमाप्रमाणे चांगल्या गुणवत्तेत करण्याचे निर्देश जि प अध्यक्ष मुक्ताताई कोकर्डे यांनी दिले.
अटल भू जल योजनेच्या कामांची वरिष्ठ अधिकार्यांची घटनास्थळ पाहणी
निकृष्ट दर्जाचे कामा घपवून घेतले जाणार नाहीं
अटल भूजल योजने घ्या कामातही कंत्राटदाराचे मनमानी पना उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ड्रिम प्रोजेक्ट ला सुरूंग लावत असल्याची तक्रार मासोद च्या सरपंच रंजू प्रकाश बारंगे व उपसरपंच रूपराव गोंडाणे यांनी वरिष्ठ अधिकारी यांचे कडे केली. या तक्रारीची दखल वृत्तपत्रांनी घेतली . सरपंचाच्या तक्रारी व वृत्त पात्रांची माहीत चे आधारे अटल भूजल योजनेच्या वरिष्ठ अधिकारी वर्षा माने मासोद येथील अटल भू जल योजनेच्या कामांची पाहणी साठी चौकशी पथकासह दाखल झाल्या.गावच्या सरपंच रंजू बारंगे व उपसरपंच रूपराव गोंडाणे यांनी उपविभागीय अधिकारी शिवराज पडोळे यांचे कडे केली होती. या तक्रारीची दखल घेत उपविभागीय अधिकारी शिवराज पडोळे यांनी अटल भूजल विभागाचे वरिष्ठ अधिकारीर्यांना घटनास्थळी पोहोचून चौकशी च्या सुचना देण्यात आल्या होत्या. उपविभागीय अधिकारी यांचे सुचनेनुसार तक्रारीची शहनिशा करण्यासाठी अटल भू जल योजनेच्या नागपूर जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक वर्षा माने मासोद येथे पोहचून नदीवर सुरू असलेल्या कामांची चौकशी केली. या कामात संबंधीत कंत्राटदारा कडून नाला खोलीकरण प्रसंगी अटल भू जल योजनेच्या उपकरणां ची मोडतोड करून झालेले काम ही सदोष असल्याचे अटल भू जल योजनेच्या वरिष्ठ भूवैज्ञानिक यांनी घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी केल्यावर संबंधित कंत्राटदाराला व कामाची देखरेख करनारे शाखा अभियंतांना सर्व कामे नियमानुसारच करण्याचे निर्देश दिले.
ग्रामीण भागातील जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत असो की अटल भू जल योजनेचे देखरेख करणारे शाखा अभियंता व कंत्राटदार या भागातील काम सुरू करण्या आधी स्थानिक स्वराज्य संस्था चे पदाधिकारी यांना कसलीही सुचना न देता काम सुरू करतात . स्थानिक स्वराज्य संस्था चे पदाधिकारी सरपंच, उपसरपंच यांच्या सुचनांकडे दुर्लक्षच करतात अशी माहिती मासोद येथील सरपंच रंजू प्रकाश बारंगे व उपसरपंच रूपराव गोंडाणे यांनी सांगितले आहे.