घनकचरा व्यवस्थापना अभावी कोंढाळीकरांचे आरोग्य धोक्यात घंटा गाड्या अभावी संसर्गजन्य आजाराची शक्यता नगर विकास व जिल्हा प्रशासनाने वेळीच लक्ष देण्याची गरज
कोंढाळी-वार्ताहर
कोंढाळी नगर पंचायती राज एक वर्ष पुन्हा झाली आहे. नगर पंचायत स्थापनेपासून अजूनही निवडणूका झालेली नाही.
सध्या नगर पंचायतीचा कारभार प्रशासक पाहत आहेत.
सध्या स्थितीत कोंढाळी नगर पंचायतीच्या हद्दीतील घान कचरा उचलनार्या घंटागाड्यांच्या अभाव व उपलब्ध असलेल्या जुनाट व कालबाह्य घंटागाड्या कधी ही बंद पडतात व बंद पडलेल्या घंटागाड्या दुरूस्तीला आठवडा घेतात. या मुळे कोंढाळी येथील प्रत्येक प्रभागातील घनकचरा
कचरा व्यवस्थापन योग्य प्रकारे होत नसल्याने कोंढाळीकराचे आरोग्य धोक्यात आले आहे. या करिता नगर विकास विभाग, जिल्हा नियोजन समिती यांचे मार्फत कोंढाळी नगर पंचायत क्षेत्रातील घनकचरा उचलण्यासाठी आवश्यक अश्या घंटा गाड्या पुरविण्याची मागणी सर्व कोंढाळीकरांची आहे.
खरे तर!आपण जसजशी भौतिक प्रगती करतो, तसतसं आपलं वस्तू वापरण्याचं प्रमाण वाढतं आणि पर्यायाने आपण निर्माण केलेल्या कचर्याचे प्रमाण आणि प्रकारही अधिक वाढतात. पण, तो कचरा साठवून राहिल्याने त्याचा नागरिकांवर व पर्यावरणावर दुष्परिणाम होतो. त्यामुळे कचरा हा योग्य पद्धतीने निकाली काढला गेला पाहिजे.
या करिता कोंढाळी नगर पंचायती हद्दीतील घान कचरा व्यवस्थापन योग्य रितीने राबविण्यासाठी सहा वार्डा साठी सहा अद्यावत घंटागाड्या पुरविण्यात याव्यात या करिता येथील नागरिकांनी राज्याचे नगरविकास विभाग सचीव, जिल्हाधिकारी नागपूर, तसेच सी ओ नगर पंचायत कोंढाळी यांचे कडे १७आक्टोबर रोजी ई मेल चे माध्यमातून मागणी अर्ज करण्यात आले आहेत अशी माहिती स्वप्निल व्यास यांनी दिली आहे.
या प्रकरणी कोंढाळी नगर पंचायत प्रशासक धनंजय बोरीकर यांचे सोबत संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की कोंढाळी नगर पंचायत भागातील नागरिकांच्या घनकचरा व्यवस्थापन योग्य प्रकारे होत नसल्याच्या तक्रारी मिळाल्या आहेत.
याबाबत घंटागाड्या साठी प्रस्ताव पाठविला आहे. घंटागाड्या करिता प्रस्ताव मंजूर झाला की घंटा गाड्या खरेदी केल्यावर घनकचरा व्यवस्थापन तक्रारी दुर केल्या जातील.
येथील सर्व राजकीय, सामाजिक , व्यापारी संघटना,चे प्रतिनिधींनी घनकचरा व्यवस्थापनासाठी वेळीच पावले उचलावी व कोंढाळीकरांचे आरोग्यावर होनारा दुष्परिणाम टाळावा अशी मागणी केली आहे.