ग्रा.पं. चिकना येथे शासकीय भूखंड विक्रीचा गोरखधंदा विकलेल्या जागेवर खुलेआम बांधकाम सुरू सचिवासह पंचकमेटी यांचा अफलातून कारभार ग्रामस्थांनी केली कार्यवाहीची मागणी
भंडारा :- लाखांदूर तालुक्यातील चिकना ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या शासकीय जागेवर मागील काही वर्षापासून काही लोकांनी अतिक्रमण करून भूखंड ताब्यात
घेतले. मात्र तेच अतिक्रमित भूखंड दुसऱ्या गावातील लोकांना लाखो रुपये किमतीत विकण्याचा सपाटा काही अतिक्रमण धारकांनी लावला असून त्या घेतलेल्या भूखंडावर राजरोषपणे बांधकाम सुरु करण्यात आहेत. मात्र त्या बांधकामावर ग्रामपंचायत प्रशासन कोणतीही कार्यवाही न करता उलट काही चिरीमिरी घेऊन त्या बांधकामाला ग्रामपंचायत प्रशासनच मुकसंमती देत असल्याची चर्चा आहे. तरी संबंधित वरिष्ठ अधिकारी यांनी याकडे लक्ष देऊन चौकोशी करून दोषीवर कार्यवाही करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
लाखांदूर तालुक्यातील चिकना हे गाव जरी लहान असले तरी त्या गावाची सीमा बघता मोठी आहे. याच गावाच्या सीमेत नवीन खोलमारा गाव वसलेले आहे. तर काही जागेत चिकना टोली म्हणून खोलमारा गावा नजीक अतिक्रमण करून वसलेली आहे. तर काही जैतपूर तई मरेगाव कडे जाणाऱ्या चौकातील आजू बाजूची जागा चराईसाठी खुली ठेवण्यात आली होती. मात्र त्या खुले जागेवर गावातीलच काही नागरिकांनी अतिक्रमण करून ती जागा आपल्या ताब्यात घेतलेली आहे. मात्र सध्यास्थितीत तीच स्वतःच्या मालकीची जागा समजून दुसऱ्या गावातील नागरिकांना लाखो रुपये किमतीत विकण्याचा गोरखधंदा सुरु केला आहे. मात्र त्यावर ग्रामपंचायत प्रशासन कोणतीही कार्यवाही न करता उलट अतिक्रमण विक्रेत्याला पाठबळ देऊन अतिक्रमण जागा घेणाऱ्याच्या नावे ग्रामपंचायत रेकॉर्डला नोंदी घेत असल्याचीही चर्चा आहे. अशा एक नव्हे तर अनेकांनी शासकीय अतिक्रमण भूखंड विक्रीचा गोरखधंदा सुरु केला असून त्यातून लाखों रुपये कमविण्याचा मार्ग शोधत आहेत. यात गोरख धंद्यात ग्रामपंचायत प्रशासनही सामील असल्याचे गावात बोलले जात आहे. या संबंधित प्रकाराची उचस्थरीय चौकोशी केल्यास सर्व घबाड बाहेर येण्याची शक्यता नाकारल्या जाऊ शकत नाही. तरी वरिष्ठ अधिकारी यांनी या प्रकरणाची योग्य ती चोकोशी करून दोषीवर कार्यवाही करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.