महाराष्ट्र हेडलाइन

ग्रामिण विद्यार्थीनींना एसटी बसची पास मोफत द्यावी – विद्यार्थी अध्यक्षा रोहिणी रणदिवे

Summary

साकोली : मागील कोरोनातील काळात सर्व ग्रामिण पालकांना आर्थिक संकट सामना व फटका सहन केला व आताही आर्थिक संकटाचा सामना करीत असून गोरगरीब व शेतकरी पालकांकडे पैसा नसून सर्व प्रथम वर्ष विद्यार्थ्यांना एसटी बसची पास मोफत द्यावी अश्या मागणीचे निवेदन […]

साकोली : मागील कोरोनातील काळात सर्व ग्रामिण पालकांना आर्थिक संकट सामना व फटका सहन केला व आताही आर्थिक संकटाचा सामना करीत असून गोरगरीब व शेतकरी पालकांकडे पैसा नसून सर्व प्रथम वर्ष विद्यार्थ्यांना एसटी बसची पास मोफत द्यावी अश्या मागणीचे निवेदन नानाभाऊ पटोले सोशल फोरम विद्यार्थी अध्यक्षा रोहिणी रणदिवे यांच्या नेतृत्वात राज्य परीवहन साकोली आगार व्यवस्थापक यांना नुकतेच देण्यात आले.
कोरोनातील काळात ग्रामिण जनतेसह शेतकरी विद्यार्थ्यांच्या पालकांना फार आर्थिक अडचणीत आणले व आता नव्या विद्यार्थ्यांना ग्रामिण भागांपासून दररोज शिक्षणाकरीता साकोलीत येण्याकरीता विद्यार्थ्यांचे पालक फार आर्थिक संकटाचा सामना करीत असतांनी सर्व प्रथम वर्ष शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना एसटी बसची पास मोफत करण्यात यावी असे साकोली आगार व्यवस्थापक गौतम शेंडे यांना नानाभाऊ पटोले सोशल फोरम विद्यार्थी अध्यक्षा रोहिणी रणदिवे यांच्या नेतृत्वात निवेदन सादर केले याप्रसंगी लिना येडे, निशा काकडे व अन्य विद्यार्थीनी हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *