ग्रामपंचायत चारगाव येथे शिवराज्याभिषेक सोहळा
दि ०६ जून २०२३ मंगळवार ला सकाळी १० वाजता ग्रामपंचायत चारगाव / साकोली येथे श्री शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. हिंदवी स्वराज्याचे संथापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४९ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन ग्रामपंचायत चारगाव येथे करण्यात आले. या कार्यक्रमा प्रसंगी चारगावचे सरपंच मोहन लंजे, उपसरपंच भिवगडेताई, कविता वलथरे ग्रामपंचायत सदस्य, सोनवाने ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक झोडे, आंगणवाडी सेविका सोनवाणे, ग्रामपंचायत चे कर्मचारी, तसेच चारगावचे पोलीस पाटील विरेंद्र सुतार व गावातील समस्त जनता उपस्थित होती.
श्री शिवराज्याभिषेक सोहळा या कार्यक्रमा प्रसंगी दिव्यांग लाभार्थ्यांना ग्रामपंचायतच्या वतीने सदिच्छा भेट देण्यात आल्या.
