ग्रामपंचायत कढोली येथे ग्राम सभा घेण्यात आली ,

गडचिरोली
चामोर्शी तालुक्यातील
कढोली येते
आज दिनांक .31/12/2024 ला
रोज मंगळवार दुपारी 1 वाजता
ग्रामपंचायत कढोली येथे ग्राम सभा घेण्यात आली , लायड मेंटल कंपनी कोनसरी या कंपनी ने आजु बाजु च्या गावात जाऊन जमीन अधिग्रहीत करत आहे, या करीता
कढोली येथील सरपंच श्री. जितेंद्र चंपत हुलके, यांच्या अध्यक्ष तेखाली ग्रामपंचायत कढोली येथील ग्राम सभा
घेण्यात आली .
या विषयावर चर्चा करण्यात आली .
या विषयाचे सुचक – श्री . श्रीकृष्ण तुळसीराम वाघाडे
अनुमोदक – श्री .सुगत रुमदेव
बारसागडे व सर्व श्री गावकरी शेतकरी लायड मेंटल कंपनी या विषयावर चर्चा करण्यात आली ठराव क्र. 5/1 उपरोक्त विषयाने ग्राम पंचायत कढोली अतंर्गत मौजा कढोली व रामपुर गट ग्रामपंचायत असल्याने शेती प्रधान आहे असुन गावातील बहुतेक कुटुंब शेती करुन आपला उदर निर्वाह करीत आहेत तरी देती हाच त्यांचा मुळ
प्रमुख व्यवसाय असुन शेतीवरच त्यांचे जिवंन अवलंबुन आहे. कढोली गावाच्या अगदी 10 . किलो मीटर अंतरावरावर असलेल्या मौजा कोनसरी येथे उद्यास आलेली लायड मेंटल कंपनी आपल्या प्रकलपाच्या विस्ताराकरिता आजुबाजुच्या गावातील जमीन अधिग्रहीत करित आहे पंरतु सदर प्रकलपाच्या विस्ताराकरिता मौजा कढोली व रामपुर गट ग्रामपंचायत असल्याने या दोन
गावातील जमीन अधिग्रहीत करण्यास नागरिक पुर्ण पणे विरोध करीत आहेत.गावातील
नागरिकाचे जिवन शेतीवर अवलंबुन असल्यामुळे
कंपनी प्रक्रल्पाकरिता शेती देऊन
भुमीहीन होण्यास तयार नाही सदर कंपनी मुळे अंत्यत मोट्या प्रमाणात वायु प्रदुषण होउन पर्यावरण धोका निर्माण होणार आहे.शिवाय नागरिकांना आरोग्य सुधा बाधा निर्माण होणार आहे तेव्हा लायड मेंटल कंपनी ला भुमि अधीग्रहण करण्यास ग्रामपंचायत कढोली व रामपुर गट ग्रामपंचायत असल्याने नागरिकाने पुर्ण पणे विरोध करीत आहेत सर्वानुमते मंजुर करीत आहेत
पोलीस योद्धा नेटवर्क न्यूज चामोर्शी तालुका
गजानन पुराम
मो .7057785181