BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

गोरखधंदा.. रेमडीसीव्हिरचा काळाबाजार करणारा डॉ. सिद्दिकी गजाआड… डॉक्टर सह दोन नसऀसह अन्य आरोपींही अटकेत.?

Summary

चंद्रपूर विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 8 मे. 2021 चंद्रपूर शहरात शुक्रवारी दुपारीच झालेल्या रेमडेसिव्हिर काळाबाजार धाड प्रकरणाच्या पोलिस तपासात धक्कादायक माहिती पुढे आली आहे. शहरातील क्राईस्ट रुग्णालयातील अतिदक्षता विभागाचे प्रभारी डॉक्टर जावेद सिद्दीकी यांना काळाबाजारा प्रकरणी रात्री अटक करण्यात […]

चंद्रपूर विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 8 मे. 2021
चंद्रपूर शहरात शुक्रवारी दुपारीच झालेल्या रेमडेसिव्हिर काळाबाजार धाड प्रकरणाच्या पोलिस तपासात धक्कादायक माहिती पुढे आली आहे. शहरातील क्राईस्ट रुग्णालयातील अतिदक्षता विभागाचे प्रभारी डॉक्टर जावेद सिद्दीकी यांना काळाबाजारा प्रकरणी रात्री अटक करण्यात आली आहे. क्राईस्ट रुग्णालयातील या गैरप्रकारात डॉक्टरला मदत करणाऱ्या 2 नर्सेसला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. क्राईस्ट रुग्णालयाला शहरातील मुख्य शासकीय कोविड केंद्राएवढेच महत्व आहे. इथली खाटांची आणि उपचाराची क्षमता लक्षात घेता हे केंद्र कोविड उपचारात मोठे योगदान देत आहे. शुक्रवारी भर दुपारीच अन्न व औषध प्रशासन पथकाने एका गुप्त माहितीच्या आधारे गांधी चौक या गजबजलेल्या भागात रेमडेसिव्हीर विक्रेता आणि खरेदीदार या दोघांना धाड घालून ताब्यात घेतले होते. गुन्हा नोंद करून हा तपास शहर पोलिस ठाण्याला सोपविण्यात आला होता. त्यानुसार माघ काढत पोलिस क्राईस्ट रुग्णालयापर्यंत पोहोचले. आता या प्रकरणात एकूण 5 जणांना अटक करण्यात आली आहे. शहर-जिल्ह्यात होत असलेल्या रेमडेसिव्हिर काळाबाजाराचे हे धक्कादायक वास्तव आहे. या रुग्णालयाला वितरित होणारे इंजेक्शन इथली टोळी चढ्या 25 हजार रुपये या किंमतीत बाहेर विकत असल्याचा खुलासा झाला आहे. या टोळीने किती इंजेक्शन अशारीतीने बाहेर विकले, याची सत्यता पोलिस चौकशीत कळणार आहे. हे इंजेक्शन रुग्णाच्या नावे वितरित होत आहेत. त्यामुळे पैशाच्या लोभापायी किती रुग्ण इंजेक्शनविना मरण पावले, याची कल्पना डोकं सुन्न करणारी आहे. रेमडेसिव्हिर काळाबाजाराची ही साखळी कुठवर जाते, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *