गोपाल काला किर्तन सामाजिक ऐक्याची मायंदळी असते ह.भ.प.पंडित शामनारायणदास महाराज चौबे
Summary
कोंढाळी/- वार्ताहर निसर्गाच्या कुशीत वसलेल्या धनोली येथील श्रीक्षेत्र साई बाबा देवस्थानाचे प्रांगणात धानोरी येथील साई भक्त बद्रीनारायण जी गांधी व त्यांच्या परिवारा तर्फे २४मे पासून आयोजित श्रीमद् भगवद्गीताकथामृत धर्मोत्सवप्रसंगी ३१मे पंडित श्याम नारायणदास महाराज चौबे यांचे अमृतमय वाणीतून सकाळी १०वाजतापासून […]
कोंढाळी/- वार्ताहर
निसर्गाच्या कुशीत वसलेल्या धनोली येथील श्रीक्षेत्र साई बाबा देवस्थानाचे प्रांगणात धानोरी येथील साई भक्त बद्रीनारायण जी गांधी व त्यांच्या परिवारा तर्फे २४मे पासून आयोजित श्रीमद् भगवद्गीताकथामृत धर्मोत्सवप्रसंगी ३१मे पंडित श्याम नारायणदास महाराज चौबे यांचे अमृतमय वाणीतून सकाळी १०वाजतापासून गोपाल काल्याचे किर्तन भागवत कथा व काल्याचे महत्त्व पटवून सांगताना धर्म पुराणा चे दाखले देत गोपाल काला व त्यामागची पार्श्वभूमी विषद करतांना सांगितले की गोपालकाल्याचा धर्मोत्सव मोठ्या हर्षोल्हासात साजरा केला जातो. गोपालकाला उत्सवाला सामाजिक ऐक्याची मांदियाळी असते. वारकरी संप्रदायात काल्याच्या कीर्तनाच्या धर्मोत्सवाचे सूत्र आहे. मुळातच, गोपाल म्हणजे गायींचे पालन करणारा. काला म्हणजे एकत्र मिसळणे. पोहे, ज्वारीच्या लाह्या, धानाच्या लाह्या, लिंबाचे वा आंब्याचे लोणचे, दही, ताक, चण्याची भिजवलेली डाळ, साखर, फळांच्या फोडी आदी मिसळून तयार झालेला हा एक खाद्यपदार्थ. हा कृष्णास फार प्रिय होता, असे सांगितले जाते. श्रीकृष्ण व त्याचे सवंगडी मिळून यमुनेच्या तीरावर हा तयार करीत असत व सर्वजण वाटून खात असत, असा भावार्थ आहे. त्याच प्रमाणे गोपाल काल्याचे महाउत्सवा बाबद पंडित श्याम नारायणदास महाराज चौबे (अयोध्या धाम)यांनी आपल्या अमृतमय वाणीतून संगितम वातावरणात विविध धार्मिक,सांस्कृतिक, व देशाचे एकता व अखंतेसाठी एकोपा असने गरजेचे आहे.धानोली येथील २४ते३१मे पर्यंत चाललेला श्रीमद् भगवद्गीता काल्याच्या महाधर्मोत्सवाचे प्रसंगी काल्याचे किर्तन महोत्सव हे येथील गांधी परिवाराच्या एकतेचे प्रतिक आहे.
या प्रसंगी सद् गुरू मणिराम महाराज,ह भ प गणेश महाराज व या महाधर्मोत्सवात सहभागी ह भ प महाराजांचे कार्यक्रम आयोजन प्रमुख साईभक्त बद्रीनारायण जी गांधी तसेच सामाजिक, धार्मिक,व लोककल्याणकारी कार्य करणारे जनप्रतिनिधी यांचे ही ह. कार्यक्रमाचे समापन प्रसंगी, पंडित श्याम नारायणदास महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.